काजू बी अनुदान योजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
*🛑काजू बी अनुदान योजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०५:-* राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेऊन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२, कृषी खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बैंक तपशिल, आधारकार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे
अनुदान मागणीसाठी आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागिय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, अथवा कृषी व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे (७२१८३५००५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, एमआयडीसी कुडाळ, हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र जामसंडे या ठिकाणी करण्यात आली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

