कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळ येथे आज साडेपाच लाखाची दहीहंडी

*🛑कुडाळ येथे आज साडेपाच लाखाची दहीहंडी*

*🛑भाजप-शिवसेना पुरस्कृत कार्यक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-३१:-* भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत कोकणातील सर्वांत मोठी ५ लाख ५५ हजार ५५५ रु. रकमेची दहीहंडी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता हायवे नजीकच्या कुडाळ एसटी आगार येथील मैदानावर साजरी करण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी आतापर्यंत २८ संघांनी सहभाग नोंदविला आहे. या संघांमध्ये दोन महिला व दोन बाल संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व संघ सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातीलच आहेत, अशी माहिती भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल व कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी दिली. हा दहीहंडी उत्सव देशभक्तीगीत व भक्तीगीत सादर करून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. येथील गुलमोहर सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. माजी सभापती अभय परब, युवामोर्चाचे श्रीपाद तवटे, रुपेश कानडे, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, विजय कांबळी, बाळा पावसकर, विनायक राणे आदी उपस्थित होते. साईल म्हणाले, माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख तथा माजी खासदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. मालवण येथील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे व नीलेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा धार्मिक उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
या उत्सवाला प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार असले, तरी हा सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हिंदी नाच-गाणी होणार नाहीत, देशभक्तीपर, धार्मिक गाणी, पोवाडे या कार्यक्रमात सादर केले जाणार आहेत. ही सिंधुदुर्ग वासियांसाठी वेगळी पर्वणी असणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील सहा ते आठ कलाकार, मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेला, सिने अभिनेता अंकुश चौधरी, कॉमेडी अभिनेता समीर चौघुले, सिने अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रियदर्शनी इंदुलकर, गौरव मोरे या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईल व वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!