कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार -डाॅ जयेंद्र परुळेकर

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार -डाॅ जयेंद्र परुळेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* काल राजकोट मालवण येथे जो राडा झाला तो काही वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात झालेल्या राड्याची आठवण ताजी करणारा होता.राज्यभरात सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार होता अशी टीका शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे. हा खरं तर जिल्ह्याचा अपमान आहे.
“घराघरात फिरून रात्री एकेकाला मारून टाकीन” “पुतळा पडला म्हणून तुमच्या भावना दुखावल्या काय?” अशी मुजोर वक्तव्यं नवनिर्वाचित खासदार माजी मुख्यमंत्री महाशयांची जर असतील तर कुठल्या संस्कृतीचे दर्शन आपण महाराष्ट्राला देत आहोत ह्याचे भान राहिलेलं दिसत नाही असे परुळेकर यांनी म्हटले आहे.
“पुतळा पडला हे शुभसंकेतच आहेत, ह्यातून पुढे चांगलंच घडेल.आता शंभर फूटी पुतळा उभारू ” अशी संतापजनक वल्गना शिक्षणमंत्री करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर गायबच झालेले आहेत. पुतळ्याची काळजी घेण्याची जबाबदारी खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाची होती.पण पुतळा नौदलाने बांधला असं जनतेची दिशाभूल करणारे विधान करून ते नामानिराळे होऊ पाहात आहेत असा आरोप परूळेकर यांनी केला. सगळाच प्रकार खरोखरच महाराष्ट्रात आणि त्यात देखील माझ्या सिंधुदुर्गात घडत आहे…यावर अजूनही विश्वास ठेवणं कठीण आहे शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!