बापर्डे – राणेवाडी येथील राणे समर्थकांचा उ.बा.ठा शिवसेनेत प्रवेश
*🛑बापर्डे – राणेवाडी येथील राणे समर्थकांचा उ.बा.ठा शिवसेनेत प्रवेश*
*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴देवगड, दि-२४:-* बापर्डे विभागातील जुवेश्वर येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत गाव दौरा बैठका घेण्यात आल्या. यावेळी बापर्डे गावातील राणेवाडी येथील सचिन राणे व ब्रम्हजीत राणे या राणे समर्थकांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना देवगड तालुकाप्रमुख फरीद काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सुशांत नाईक यांनी त्यांचे हाती मशाल देत पक्षात स्वागत केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मार्गदर्शन केले की, प्रथमता तुम्ही शिवसेणें च्या ठाम पाठीशी राहून आपला बालेकिल्ला जपलात त्याबद्दल जुवेश्वर वासिसांचे आभार मानतो. असेच कयम शिवसेनेच्या पाठी रहा, तुम्हाला लागणारी मदत पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळो करू. गेली अनेक वर्षे या मतदार संघात राणेंची सत्ता आहे तरी या मतदार संघाचा विकास झाला नाही, कणकवली-देवगड-वैभववाडी येथील बस स्थानक, शासकीय रुग्णालय यांची बिकट अवस्था का ? एवढी वर्षे सत्ता असून राणेंनी विकास का केला नाही. आपल्या मतदार संघाला विकास कामान पासून वंचित का ठेवले याची विचारणा आता जनतेतून यायला लागली आहे. ज्या ठिकाणी राणेंना कमी मते आहेत त्या ठिकाणी जाऊन राणे लोकांना वेगवेगळी अमिशे दाखवत आहेत, तुम्ही त्या खोट्या अमीशांना बळी पडू नका. व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा सोबत राहून आता येणाऱ्या विधानसभेवर विजयाचा भगवा फडकवूया. असे यावेळी जिल्हाप्रमुख नाईक यांनी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना देवगड तालुका प्रमुख फरीद काझी, उपतालुका प्रमुख दत्ताराम तिर्लोटकर, शाखाप्रमुख बाळकृष्ण नरसाळे, प्रदीप येझरकर, आनंद घाडी, रोशन मुळम, रवींद्र मुळम, दिनेश वेद्रुक, नितीन घाडी, विठ्ठल वेद्रुक आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

