डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
*🛑डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२३:-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेऊन मागासवर्गीय शेतकरी कुटुंबांनी सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करून उत्पादन वाढ व त्यायोगे स्वतःचा आर्थिकस्तर उंचवावा, असे आवाहन मालवण बीडिओ आत्मज मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनु. जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नवीन विहिरी अडीच लाख, जुनी विहीर ५० हजार, इनवेल बोअर २० हजार, वीज जोडणी १० हजार, पंप संच २० हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लाख रु. व सूक्ष्म सिंचन सुविधंतर्गत तुषार सिंचन, ठिबक सिंचनासाठी २५ ते ५०
हजार प्रति हेक्टरी मर्यादित अनुदान
देय आहे. या योजनेंतर्गत ज्या अनु. जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना लाभ घेण्याचा आहे, त्यांच्या नावे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर जमीन धारणा आवश्यक आहे. जमिनीचे – ७/१२, ८ अ उतारे, जातीचा दाखला, आधारकार्ड, मतदानकार्ड, बैंक खाते, पुस्तकाचे पहिले पान, १.५० लाख रु. पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असल्याबाबत तहसीलदारांचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून लाभार्थी निवड ग्रामसभेत करण्यात येते. अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टलचे https://mahabdtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांना अर्ज करावा. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्रे, ग्रा.पं. केंद्र इत्यादीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यावर ग्रामसभेच्या शिफारशीने आवश्यक कागदपत्रांसह पं. स.कडे लाभार्थीन संपर्क साधणे आवश्यक आहे. वैयक्तिक लाभार्थी निवडताना महिला, अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थीची निवड होणार आहे. अनुदानाची रक्कम थेट हस्तांतरण पद्धतीने लाभार्थीच्या आधार जोडणी केलेल्या बँक खाती जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मोरे व वालावलकर यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

