ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता साखर कारखान्यांनी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावे; कृषीमंत्री दादाजी भुसे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१३: ऊसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याकरिता प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. ऊसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

राज्यातील ऊस संशोधन प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.धवन, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे (व्हीएसआय) संचालक विकास देशमुख, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ.रासकर, डॉ.शरद गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि ‘व्हीएसआय’ यांनी राज्यातील ऊस ऊपादन व संशोधनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने समन्वय करण्याचे आवाहन कृषीमंत्री श्री.भुसे यांनी केले.

राज्यात ऊस संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि व्हीएसआय या संस्था अग्रणी आहेत. कोकणात देखील ऊसाखालील क्षेत्र वाढण्यास संधी असून त्या संदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकुल असून त्या अनुषंगाने व्हीएसआयने तेथे ब्रिडींग सेंटर उभारले आहे. तेथे देशातील विविध वाणांची लागवड करण्यात आली असून संशोधनाचे कार्य सुरु आहे. या क्षेत्राचा वापर कृषी विद्यापीठांनी करावा. तसेच व्हीएसआयला चाचण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!