कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा इम्पॅक्ट ; त्या संबंधितावर होणार गुन्हे दाखल
मळेवाड राजगड हॉटेलच्या पाठीमागे चालू असलेल्या जिरेखानी मध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराच्या पाच वर्षिय बालिकेचा मृत्यू तिच्या अंगावर चिरा पडल्याने झाला व परस्पर हे प्रकरण मिटवण्यात आल्याची बातमी कोकण लाईव्ह मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनेची माहिती घेतली असून तपासांती संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल शी बोलताना स्पष्ट केले
परप्रांतीय मजुराची मुलगी प्रांत विधीसाठी खाणीमधील खालच्या भागात बसली होती वरून चिरे ओतत असताना तिच्यावर एक चिरा पडला व त्या तिचा मृत्यू झाला, हा एक निव्वळ अपघात होता, मात्र याबाबतची माहिती पोलिसांना न देता सामोपचाराने सदरचे प्रकरण मिटवले गेले व याबाबतची चर्चा मळवाड पंचक्रोशीत रंगू लागली याबाबतची माहिती कोकण लाईव्हला देण्यात आली ,कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलने यावर प्रकाश टाकल्यावर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व संबंधित घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू केले असून तपासांती संबंधिताविरोधात पुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले.

