कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी-बावळाट एसटी बस वेळेत सोडा !

*🛑सावंतवाडी-बावळाट एसटी बस वेळेत सोडा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* सावंतवाडी बसस्थानकातून सकाळी ९.१५ वाजता सुटणारी बावळाट बस पूर्वीपासून शालेय फेरी नसून ती नियमित फेरी आहे. तसेच ही अनेकवेळा तब्बल एक ते सव्वा तास उशिरा सुटते. पर्यायाने या मार्गावरील प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शालेय सुट्टीच्या दिवशी ही फेरी बंद न करता नियमित आणि दररोज वेळेत सोडावी, अशी मागणी बावळाट ग्रामस्थांनी सावंतवाडीचे एस. टी. आगारप्रमुख नीलेश गावित यांच्याकडे केली. सावंतवाडी बस स्थानकातून सकाळी ९.१५ वाजता सुटणारी बावळाट बस अनेक वेळा तब्बल एक ते सव्वा तास उशिरा सुटते. त्यामुळे याचा फटका शाळकरी मुलांना बसत असून माडखोल आणि दाणोली
हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. तसेच ही शालेय फेरी नसून ती नियमित फेरी आहे. त्यामुळे शालेय सुट्टीच्या दिवशीही ही फेरी नियमित आणि वेळेत सोडावी. तसेच पूर्वीची सायंकाळी ६.१५ ची बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सातुळी बावळाट सरपंच सोनाली परब, माजी सरपंच उत्तम परब, माजी उपसरपंच पांडुरंग बुराण, ग्रामपंचायत सदस्य योगिता बुराण, रमेश परब, सुरेश कदम, रमाकांत परब, बाबा सावंत, दिलीप सावंत, दत्तप्रसाद सावंत, सुरेश परब, देवीदास परब, मोहन जाधव, उदय नाईक, भालचंद्र परब, रोहीत बिरोडकर, रामकृष्ण ठाकुर, एकनाथ परब, मुकेश दळवी, नकुल शृंगारे, योगेश बुराण, परेश परब, प्रतीक सावंत, देवेंद परब ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!