कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१३: मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात येतो. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे महाविद्यालये, ग्रंथालये इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राज भाषा असलेल्या मराठी भाषेचा उपयोग जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने यंदाच्या वर्षी दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबईच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” या कार्यक्रमाचे  उद्घाटन दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई येथे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दुरदृश्य प्रणालीव्दारे (ऑनलाईन पध्दतीने) करण्यात येणार आहे. उद्घाटनपर कार्यक्रमामध्ये मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषेतील पीडीएफ आणि डिजिटाईजड स्वरुपातील ग्रंथांची लिंक ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ग्रंथप्रदर्शन व संकेतस्थळावरील अंकीय ग्रंथांचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मनिषा देवगुणे, सहाय्यक आयुक्त (विकास शाखा) कोकण भवन, नवी मुंबई यांनी लिहिलेल्या मराठी ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नगर विकास,ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण ओ.पी. गुप्ता, मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, राजीव निवतकर जिल्हाधिकारी, मुंबई शहर आदी मान्यवर उपस्थित असणार आहे.

दुरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन कार्यक्रमात सहाभागीसाठी https://www.youtube.com/DOLMaharashtra या लिंकवर क्लीक करावे व जास्तीत जास्त नागरीकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन‍ जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन बा. हजारे यांनी केले आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!