गोरे,गोमटे आलेत आणि शुभेच्छा देऊन गेले -राजन तेली.
*🛑गोरे,गोमटे आलेत आणि शुभेच्छा देऊन गेले -राजन तेली.*
*🛑दिलेल्या शुभेच्छा मनापासून होत्या काय? हे तपासण्याची वेळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* संजू तुमच्या वाढदिवसाला गोरे गोमटे आले आणि शुभेच्छा देऊन गेले या शुभेच्छा राजकीय होत्या त्या किती खऱ्या होत्या व किती खोट्या होत्या याचे आत्मपरीक्षण तुलाच करावे लागेल असे शालजोडीतले कुणाचे नाव न घेता देत माजी आमदार राजन तेली यांनी संजू परब यांना त्यांच्या वाढदिवसाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस आज बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मोठ्या उत्साहात व जोषपूर्ण वातावरण संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी सैनिक बँकेचे व्यवस्थापक सुनील राऊळ प्रमोद सावंत ,प्रमोद गावडे ,चंद्रकांत राऊळ आदी मान्यवर मंडळी व संजू प्रेमी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजन तेली यांनी कुणाचे नाव न घेता गोरे गोमटे आले व शुभेच्छा देऊन गेले त्या शुभेच्छा किती मनापासून होत्या किती खऱ्या होत्या याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे ,काहीजण राजकीय द्वंद्व घडवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात मात्र भाजपच्या सुरुवातीच्या काळात २०१४ मध्ये ही मंडळी कुठे होती याचाही विचार केला गेला पाहिजे ,कोणी कोणावर बोलावे याचे तारतम्य , बाळगले पाहिजे ,कोणीही उठतो व कोणावरही बोलतो आपले वय काय? योगदान काय? याचा विचार करत नाही फक्त राणे कुटुंबावर आपले किती प्रेम आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो असेही यावेळी बोलताना राजन तेली यांनी सांगितले.पक्षाकडे उमेदवारी मागणे गैर नाही तो प्रत्येकाचा हक्क आहे मात्र संघटना वाढीसाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे त्यामुळे भविष्यात संघटना वाढीवर लक्ष द्या पक्ष ज्याला उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे राहू द्या असे राजन तेली यावेळी बोलताना म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

