*आमचो हक्काचो माणूस संजू आमदार होऊ दे सर्वसामान्यांची भावना*
*आमचो हक्काचो माणूस संजू आमदार होऊ दे सर्वसामान्यांची भावना*
*अडलेल्या नडलेल्या,गोर गरींबाचा हक्काचा माणूस -संजू परब*
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या व सावंतवाडी सारख्या बापू साहेब महारांचा वारसा लाभलेल्या सुसंस्कृत शहरात लहानाचा मोठा झालेला सच्चिदानंद उर्फ संजू परब यांची खरी राजकीय ओळख याच शहराने निर्माण करुन दिली, सावंतवाडी शहराचा नगराध्यक्ष हा सोनेरी मुकुट संजू परब यांच्या ध्यानी मनी नसताना डोक्यावर चढला मात्र याने हुरळून न जाता, उन्मत्त न होता ते या पवीत्र भूमिवर घट्ट पाय रोवून उभे राहिलेत व सावंतवाडी करांचे ते हक्काचे संजू झालेत.
सावंतवाडी तालुक्यातील मडुरा हे मूळ गाव असलेले संजू परब लहानाचे मोठे सावंतवाडीतच झाले. सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कुल मधून माध्यमिक शिक्षण व श्री पंचम खेमराज महाविद्यालयात उच्चशिक्षण घेऊन खासदार नारायण राणे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला,अगदी शाखा प्रमुख पदापासून लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी उतुंग भरारी संजू परब यांनी मारली ती कार्यकर्त्यांच्या व नेतेमंडळींच्या भक्कम पाठींब्यावरच , राजकारण करत असताना जमीन खरेदी विक्री च्या व्यवसायात ते उतरलेला, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात आपले करियर घडविण्यासाठी उतरले व बिल्डर्स व डेव्हलपर्स म्हणून ओळखले जाऊ लागले. माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या मर्जीतले म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे. मा. खासदार निलेश राणे यांनी आपल्या घरातील सदस्य म्हणून देखील त्यांचा अनेक उल्लेख केला आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी सावंतवाडीतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत २३ वर्षे सावंतवाडी नगरपलिकेतील दीपक केसरकर यांची निर्विवाद असलेली सत्ता उलथवून अनपेक्षितरीत्या संजू परब सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले व संजू परब यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली तेव्हा पासून ते सर्वांच्या नजरेत आलेत व आमदारकीचा स्थानिक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्या पूर्वीच नगरपालिका निवडणुकीत आपले आठ नगरसेवक निवडून आणून त्यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली होती. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र सर्वच आघाडींवर श्रेष्ठ ठरत त्यांनी विजय अक्षरशः खेचून आणला होता. त्यांच्या विजयामुळे सावंतवाडी नगरपालिकेत प्रथमच नारायण राणे, नितेश राणे यांनी सत्ता आली आणि गेली कित्येक वर्षे सावंतवाडीवर सत्ता मिळविण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न साकार झाले होते, त्यामुळे सावंतवाडीचा भावी आमदार म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जायचे. परंतु त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते राजन तेली हे दोन वेळा सावंतवाडी विधानसभा लढले असल्याने संजू परब यांचे नाव मागे पडले होते,मात्र संजू परब यांनी आपली जिद्द सोडली नाही,ते काम करीत राहिलेत,श्रदा और सबुरी ही साई बाबाची शिकवण त्यांनी जपली म्हणूनच आज स्थानिक चेहरा म्हणून संजू परब यांच्या कडे पाहिले जाते.
संजू परब हे सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेले नेतृत्व आहे. कुटुंबातील सर्वच व्यक्ती उच्चशिक्षित असल्याने एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबाचा वारसा त्यांना लाभलेला आहे. गोरगरिबांचा कळवळा असलेले संजू परब संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात.
संजू परब मदत करताना पक्षाकडून अथवा वरिष्ठ पातळीवरून मदत येईल यासाठी कधीही वाट पाहत थांबत नाहीत, स्वखर्चाने गरजूंना मदत करून त्यांच्या समस्या मार्गी लावतात. त्यामुळेच अनेक लोक मोठ्या आशेने त्यांच्याकडे मदतीसाठी येतात. सरकारी दफ्तरातील कामे असो वा इतर शासकीय कामे स्वतः लक्ष देऊन ते लोकांना सहकार्य करतात. त्यामुळेच संजू परब यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.
राणे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले संजू परब यांच्या यशाचा आलेख उंचावतच त्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भक्कम साथ संजू परब यांच्या पाठीशी आहे,गेळे जमिनीवरुन केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील छुपे शीतयुद्ध संजू परब यांच्या पथ्यावर पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, नगरपालिकेच्या निवडणुकीत दिपक केसरकर विरुद्ध बबन साळगावकर यांच्यातील शीतयुद्ध संजू परब यांच्या पथ्यावर पडून ते सावंतवाडी चे नगराध्यक्ष झाले,आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे गेळे जमिनीवरुन केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण व त्यांचे कट्टर समर्थक संदिप गावडे यांच्या मध्ये जे शीत युध्द सुरू आहे ते संजू परब यांच्या पथ्यावर पडून ते
आमदार झालेत तर नवल वाटून घेण्याची गरज नाही कारन संजू परब यांचा घोडा रेस मधील आहे व तो शर्यत जिंकण्याची जिद्द बाळगून आहे.
संजू परब यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल कडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी शुभकामना

