तेरवण स्मशानभूमीसाठी पाच लाखाचा निधी
*🛑तेरवण स्मशानभूमीसाठी पाच लाखाचा निधी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-१७:-* तालुक्यातील तेरवण गावठाण स्मशानभूमीची अवस्था बिकट झाली असून शेवटच्या घटका मोजत आहे. चार वर्षांपासून स्मशानभूमिवरील पत्रे उडत आहेत. मात्र, ग्रा.पं. प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. महिन्याभरात स्मशानभूमीची दुरूस्ती न झाल्यास ग्रा.पं.त शव आणले जाईल, असा इशाराही काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केरकर यांनी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी जनसुविधा विशेष अनुदान या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तेरवण-मेढे ग्रा.पं.अंतर्गत येणारी
स्मशानभूमी मोडकळीस आली आहे. चार वर्षांपूर्वी पत्रे उडाले आहेत. याकडे ग्रा.पं.चे लक्ष वेधल्यानंतर दीड वर्षांपूर्वी सरपंच व ग्रामसेवक यांनी गावात येऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. स्मशानभूमीचा विषय ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर मांडला होता. नंतर एका फॅब्रिकेटर्सचे काम करणाऱ्यास स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी येणाऱ्या अंदाजे खर्चाबाबत विचारून घेतले. त्याने खर्चही सांगितला. नंतर अद्याप कार्यवाही झालेली नाही. जि. प. बांधकामकडे चौकशी केल्यावर स्मशानभूमी बांधकामाचा प्रस्ताव
या विभागाकडे आलेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा सरपंचांकडे विचारणा केली असता जुलै पर्यंत स्मशानभूमीचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. स्मशानभूमी सभोवती घनदाट, काटेरी झुडपे होती. त्यामुळे मृतदेह घेऊन जाताना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांनी स्वतः खर्चाने जेसीबी मशीन लावून परिसर साफ केला. याकडे शिवसेना कार्यकर्ते विजय गवस, सदाशिव गवस, विजय गवस, विश्वनाथ गवस, संतोष गवस, तुकाराम गवस आदींनी मंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली. यावेळी त्यांनी जनसुविधा विशेष अनुदान योजनेंतर्गत निधी मंजूर करून दिला ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
