शुभ्र धुक्याच्या पहाटे आंबोली चैतन्याने सळसळली…
*🛑 *शुभ्र धुक्याच्या पहाटे आंबोली चैतन्याने सळसळली…*
*🛑 बहुचर्चित आंबोली मान्सून मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धक दौडले!..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-१७:* निसर्गरम्य आंबोली आज भल्या पहाटे उत्साहाने सळसळली होती आणि त्याचे कारण होते, आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा! सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्रजी चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन आज १६ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता स्पर्धक आणि क्रीडारसिक यांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशालजी परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. यातील पहिला टप्पा २१ किलोमीटरचा तर दुसरा ६ किलोमीटरचा ठेवण्यात आला होता. या दोन्ही गटात मिळून पाचशेपेक्षाही अधिक स्पर्धकांनी घेतलेला सहभाग आणि हजारो क्रीडा रसिकांनी उपस्थित रहात टाळ्यांच्या गजरात दाखवलेला पाठिंबा हे या आंबोली मान्सून मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. पहाटेच्या धुक्यात दौडणाऱ्या स्पर्धकांमुळे आज आंबोली उत्साहाने सळसळत असल्याचे चित्र दिसून आले. या स्पर्धेच्याकार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या समवेत यावेळी त्यांच्यासोबत आंबोली रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, संतोष पालेकर, दिलिप भालेकर, केतन आजगांवकर, उत्तम नार्वेकर, आंबोली ग्रा. पं. सदस्य सौ. छाया नार्वेकर, कोजमा डिसोजा, मायकल डिसोजा, दोडामार्ग येथील भाजपा पदाधिकारी रंगनाथ गवस, दोडामार्ग मिडियाचे शिरीश नाईक, मोरगाव सरपंच संतोष आईर, प्रविण गवस, अंकुश नाईक, सर्वेश पालकर, रविंद्र देसाई, दोडामार्ग तालुका कृषी आघाडी प्रमुख मनोहर देसाई, संजय उसपकर, जितू गावकर, विनायक ठाकूर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, मंदार पिळणकर, धिरेंद्र म्हापसेकर, बुथ अध्यक्ष विराग मडकईकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप, आडेली सरपंच परेश हळदणकर, बोवलेकर सर, प्रशांत नाईक, साईप्रसाद नाईक, आबा एरम, राकेश धावडे, विष्णू कुबल, गणेश पडते, काका भिसे, प्रदिप जाधव, जोस्ना कर्पे, गजानन कर्पे, पुंडलीक कदम, आदी उपस्थित होते. मान्यवर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धेची क्षणचित्रे*
आंबोली ग्रामपंचायतीने पहाटे सहा वाजता स्पर्धा सुरू होणार असूनही सहभागी स्पर्धा आणि प्रेक्षक यांच्या गर्दीचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते.
🔲 कबीर नावेद हेरेकर या आठ वर्षाच्या मुलाने या स्पर्धेत सहभाग घेतला. आतापर्यंत त्याने दहा मॕरेथॉन स्पर्धेत भाग घेतला असून आंबोली मान्सून मॕरेथॉन ही त्याची अकरावी स्पर्धा होती. हा छोटा मुलगा निष्णात सर्पमित्र असून त्याने आतापर्यंत वेगवेगळे साप, अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत. आंबोली नॅचरल डायव्हर्सिटीच्या पार्श्वभूमीवर हा छोटा मुलगा आयकॉन ठरला होता.
🔲 २१ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत पुरुष गटातून सिद्धेश बारजे तर महिला गटातून दीपिका चौगुले विजेती ठरली तर ६ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतिक वर्मा तर मुलींच्या गटातून आयुष्या राऊळ हे सर्वप्रथम विजेते ठरले आहेत. १८ वर्षावरील पुरुष गटात ओंकार बायकर तर महिला गटात वैष्णवी चौधरी विजेते ठरले. अनेक क्रिकेट स्पर्धांचे देशपातळीवर मालवणी भाषेत दणकेबाज समालोचन करणारे प्रसिद्ध समालोचक श्री बादल चौधरी यांच्या निवेदनाने पूर्ण स्पर्धेवर एक उत्साहाचे गारुड पसरले होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

