कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने हरघर तिरंगा मोहिमेंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार

*🛑सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने हरघर तिरंगा मोहिमेंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* नगरपरिषदेच्या “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमेत ज्यांनी देशासाठी आपले सारे जीवन अर्पण केले शत्रू च्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या झेलल्या तरीही तिरंगा खाली पडू दिल्या नाहीत अशा सावंतवाडी शहरातील माजी सैनिकांचा सन्मान सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे  आरोग्य व क्रीडा माजी सभापती  सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते माजी सैनिक जवानांचा सन्मान करण्यात आला यावेळी सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, माजी नगरसेवक आनंद नेवगी स्वच्छता विभागाच्या रसिका नाडकर्णी बांधकाम अभियंता शिवप्रसाद  कुडपकर, दीपक म्हापसेकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे आदी सह सर्व शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. लोकांच्या हदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाब‌द्दल जागरुकता वाढवणे, हे सदर उपक्रम राबविण्यामागील मुळ कल्पना आहे. त्याअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सैनिक
विष्णू ताम्हाणेकर  गजानन तेजम पांडुरंग नाईक उत्तम कदम अनंत लुष्टे विश्वनाथ बांदेकर जगन्नाथ  परब यांचा सत्कार करण्यात आला सावंतवाडी शहरात विदयार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात शाळांपासून होवून सांगता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउदयान येथे झाली. १४ ऑगस्टला सकाळी आठ वाजता होणार बाईक रॅली चे आयोजन  सावंतवाडी शहरात दिनांक १४ ऑगस्टला सकाळी ८.०० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीची सुरुवात व सांगता जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउदयान येथे होणार आहे.
या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!