आम.नितेश राणे खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी,अपूर्व उत्साहात जनतेने केले स्वागत..!
*🛑आम.नितेश राणे खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी,अपूर्व उत्साहात जनतेने केले स्वागत..!*
*🛑तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” अभियानाला जनतेचा उदंड प्रतिसाद*
*🛑थेट संवाद साधत जनतेचे म्हणणे आमदार राणे यांनी घेतले जाणून,*
*🛑गाव विकासाच्या धोरणावर आमदार आणि जाणता यांच्यात पहावयास मिळाला समन्वय*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०६:-* कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी “तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” जनसंपर्क मोहिम आज पासून सुरू केली. पहिल्या दिवशी खारेपाटण येथे गाव भेटीचा कार्यक्रमास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री कालभैरव मंदिर येथे आशीर्वाद घेत आम. नितेश राणे यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ केला. खारेपाटण मधील ग्रामस्थांशी नितेश राणे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. खारेपाटण व्यापारी संघटना,आरोग्य विभाग , विजवितरण, एसटी महामंडळ, रिक्षा संघटना,महिला बचत गट, सहकार, शैक्षणिक विभाग, अशा सर्वच क्षेत्रातील लोकं या जनसंपर्क मोहिमेत सहभागी झाले होते. प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेल्या कामाबद्दल आभार मानले व आपल्याला हव्या असलेल्या काही सोयी सुविधाबाबत नितेश राणे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली.
मागच्या लोकसभा निवडनुकीत झालेले मतदान यांची चर्चा करून येणाऱ्या विधानसभा निवडूकीत सुद्धा आपल्या खारेपाटण वासियांनाचा निवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद व पाठींबा असेल असा विश्वास आम राणे यांनी व्यक्त केला.खारेपाटण येथील पुराची समस्या, बाजरापेठ येथील रस्त्याची समस्या, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बस ची समस्या, खारेपाटण येथील ट्रॅफिक ची समस्या,सूकनदी तील गाळ उपसा ची मागणी, तसेच खारेपाटण बस स्टॅन्ड येथील जुने शौचालय पाडून रिक्षा वाल्याना जागा मोकळी करून देण्याची मागणी, खारेपाटण येथील रिंग रोड, तसेच संरक्षक भिंत, अशा अनेक विषयांवर उपस्थित ग्रामस्थांनी चर्चा केली.. या सर्व मागण्या व समस्या जाणून घेऊन आम. नितेश राणे यांनी लोकांना सांगितले की या सर्व तुमच्या समस्या व मागण्या आहेत त्यावर उपाय काढून सर्व कामे पूर्ण करण्यात येतील.
यावेळी खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,तालुकाध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, मजी जि. प. सदस्य बाळा जठार,विधानसभा मतदार संघ प्रमुख मनोज रावराणे,माजी सभापती दिलीप तळेकर,, माजी पं. स. सदस्या तृप्ती मालवदे,माजी सरपंच रमाकांत राऊत,व्यापारी असोशिशन चे अध्यक्ष प्रांजल कुबल, भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल,मधुकर गुरव,विजय देसाई, प्रवीण लोकरे,भाऊ राणे, श्री. कोरगावकर, नंदकिशोर कोरगावकर,रवींद्र शेट्ये, इस्माईल मुकादम, यशवंत रायबागकर,शेखर शिंदे,ग्रा. पं सदस्य क्षितिजा धुमाळे, मनाली होनाळे, दक्षता सुतार, आस्थाली पवार, अमिषा गुरव, जयदीप देसाई, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे,उज्वला चिके, आस्था पाटणकर, बचतगट अध्यक्षा, खारेपाटण दूरक्षेत्र चे अंमलदार -उद्धव साबळे आदि सह अनेक महिला वर्ग व खारेपाटण येथील सर्व ग्रामस्थ या जनसंपर्क मोहिमे साठी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

