Uncategorized

व्ही एन नाबर प्रशालेत संगीताचे वर्ग सुरू

व्ही एन नाबर प्रशालेत संगीताचे वर्ग सुरू

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

 

व्ही.एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत आज देवश्री संगीत विद्यालय, संचालित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तसेच उपशास्त्रीय,सुगम संगीत,संगीत भजन, गायन व हार्मोनियम क्लासेस चे उद्घाटन झाले.उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई मॅडम यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.संगीत विशारद श्री सागर राठवड यांनी या क्लास बद्दल थोडक्यात माहिती दिली.या क्लास ची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत की,अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या अभ्यासक्रमांतर्गत परीक्षांचे मार्गदर्शन केले जाईल,त्याचप्रमाणे भारतीय संगीत कलापीठ यांच्या अभ्यासक्रमांतर्गत परीक्षांचे मार्गदर्शन होईल.या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय व भारतीय संगीत कलापीठ यांच्या परीक्षा उत्तीर्ण असल्यास 10वी बोर्ड व 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीचे 10 गुण दिले जातात. तसेच देवश्री संगीत विद्यालयच्या शाखा आचरा,ओरोस, कडावल,माणगाव येथे सुरु असून त्यामध्ये शेकडो विद्यार्थी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये रंगमंच सादरीकरणाच्या योग्य पद्धती तसेच रियाझ विषयीचे मार्गदर्शन केले जाईल.त्यामुळे मनाची एकाग्रता,धाडस, वाढवून कलाकार घडतील व जीवनात सुप्त गुणांची जडण-घडण होईल.संगीत शिकणाऱ्यांसाठी वयाची कोणतीही अट नाही.या क्लास चे संचालक संगीत विशारद श्री सागर राठवड सर यांना संगीत क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव असून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरवले आहेत आणि अजून ही त्यांचे या क्षेत्रात काम चालू आहे.दर गुरुवारी व्ही एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा,या प्रशालेत संध्याकाळच्या सत्रात दुपारी 3.30 ते 7.30 या वेळेत हे क्लासेस होतील.

या उद्घाटन प्रसंगी कै भाईसाहेब सावंत महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर के सावंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रशालेच्या व श्री सागर राठवड यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.मनाली देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत या क्लास चा सर्वांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. मान्यवरांच्या विनंतीस मान देऊन श्री सागर राठवड यांनी गणेश स्तुती करून गीत सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमास गव्हर्निंग कौन्सिल चे अध्यक्ष श्री भाऊ वळंजू सर,श्री शशी पित्रे सर,आर के सावंत सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दीक्षा नाईक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!