कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

बांदा इनरव्हील क्लब पदग्रहण सोहळा उत्साहात.

*🛑बांदा इनरव्हील क्लब पदग्रहण सोहळा उत्साहात.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०३:-* इनरव्हील क्लब ऑफ बांदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बांदा विविध कार्यकारी सोसायटी च्या आळवणी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात क्लब च्या अध्यक्षपदी अर्चना पांगम, उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट,सेक्रेटरीपदी प्रियांका हरमलकर, खजिनदारपदी श्वेता येडवे,आय.एस.ओ.पदी निनता गोवेकर तर एडिटरपदी अक्षता साळगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली.या सोहळ्याच्या विशेष अतिथी इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या माजी अध्यक्ष रिया रेडिज आणि माजी सेक्रेटरी डॉ.मीना जोशी यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी तसेच नवीन सदस्य यांचे पदग्रहण झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.यावेळी विशेष अतिथी म्हणून पतंजली योगचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी योग शिक्षक चंद्रशेखऱ बांदेकर उपस्थित होते.त्यांनी उत्तम आरोग्यासाठी महिलांनी नियमित योगासने व प्राणायाम करुन निरोगी राहण्याबाबत मार्गदर्शन केले.इनरव्हिल क्लबतर्फे त्यांचा योगशिक्षण प्रसारकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात इनरव्हील क्लब ऑफ बांदाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.तसेच गरजू विद्यार्थीनीला गणवेश तसेच गरजू महिलेला शिलाई मशिन प्रदान करण्यात आली.रिया रेडिज यांनी आपल्या मनोगतात बांदा क्लबने या वर्षभरात विविधी समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले.तसेच वाटचालीस शुभेच्छा सहकार्याचे आश्वासन दिले. सावंतवाडी इनरव्हील क्लब अध्यक्ष सुमेधा धुरी व सेक्रेटरी चित्रा देसाई यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. राखी कळंगुटकर,चित्रा भिसे,श्रृती वळंजु,सोनाली राणे,अनुराधा धामापुरकर,माधवी गाड,मृणाल तोरसकर आदी या बांदा क्लबच्या सदस्य बनल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना पांगम यांनी,सुत्रसंचालन अक्षता साळगांवकर यांनी तर आभारप्रदर्शन माधवी गाड यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!