करियरवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा राजमार्ग; कुलगुरू डॉ.संजय सावंत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.११: कोकणात गोड्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय वाढीला फार मोठी संधी आहे. या व्यवसायातील संधी ओळखून तरुणांनी उत्तम प्रकारे योग्य नियोजन केले तर चांगल्याप्रकारे शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा राजमार्ग निर्माण होऊ शकतो. यातून आर्थिक उन्नती चांगल्याप्रकारे होऊन शोभिवंत माशांचा हब निर्माण होऊ शकतो. एवढी मोठी ताकद या कोकण भूमीतील या व्यवसायात आहे. ही संधी वेळीच उचलून सकारात्मक पाऊल टाकण्याची गरज आहे, असे प्रतिपादन दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत यांनी केले.

कोकणातील शोभिवंत मत्स्य उत्पादक शेतक-यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना कोकण कूषी विद्यापीठाच्या मत्स्य संशोधन विभागामार्फत कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे.त्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत थेट मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी नाधवडे येथे आले होते.येथील मत्स्य उत्पादक आणि शोभिवंत मत्स्य उत्पादन चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक व्यापक व जोमाने गतिमान होण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन काम करणारे राज अँक्वाचे प्रणेते राजेश परब यांच्या शोभिवंत मत्स्य पालन प्रकल्पाला भेट देऊन विस्तृत चर्चा केली.

यावेळी डॉ.इंदुमती सावंत, मत्स्यतंत्र पदविका विद्यालय शिरगांव-रत्नागिरीचे प्राचार्य डॉ.मंगेश शिरधनकर व अन्य सहकारी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रथम कुलगुरू डॉ. सावंत यांनी मत्स्य प्रकल्पाला भेट देऊ समस्या आणि गरजा जाणून घेतल्या.त्याचबरोबर त्याबाबत कूषी विद्यापीठाच्या मत्स्य संशोधन टिमच्या सहकार्याने ठोस उपाययोजना राबविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे.त्यासाठी मत्स्य उत्पादक शेतकरी ,संशोधक आणि मी स्वतः उपस्थित राहून लवकरच स्वतंत्र विचारमंथन बैठकीचे आयोजन करून कूतीबध्द आराखडा बनविण्याचा मनोदय कुलगुरु डॉ. सावंत यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

तर डॉ.मंगेश शिरधनकर म्हणाले, कोकणात शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाला पोषक वातावरण आणि पाणी उपलब्ध आहे.जिल्ह्यात मत्स्य शेतीतून मत्स्य क्रांती घडवून येईल एवढी मोठी क्षमता आहे.येथील तरुणांना मत्स्य उत्पादन व विक्रीतून चांगला मोठा उत्पन्नाचा मार्ग मिळू शकेल एवढी मोठी क्षमता या व्यवसायात आहे असे सांगितले.त्यासाठी लागणारे सहकार्य मत्स्य संशोधन विभाग निश्चित देईल.

राज अँक्वा फर्मचे प्रगत मत्स्य उत्पादक राजेश परब यांनी मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, व्यवसायाची सध्यस्थिती आणि कोणकोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात याविषयी सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर त्याबाबत परिपूर्ण लेखी प्रस्ताव कुलगुरूंकडे सुपूर्द केला.

कुलगुरु डॉ.संजय सावंत यांच्या प्रत्यक्ष प्रकल्पांना दिलेल्या भेटीतून आणि सकारात्मक चर्चेतून दिलेला उत्तम प्रतिसाद पाहता बऱ्याचशा गोष्टींची सकारात्मक पावले पडून कोकणातील शोभिवंत मत्स्य व्यावसायाला अधिक चांगली चालना मिळेल अशी आशा मत्स्य उत्पादकांना आहे.दूरदृष्टी असणाऱ्या कुलगुरूंनी या व्यवसायाची ताकद ओळखून सिस्टीममध्ये सुधारणा करण्याचे सकारात्मक संकेत दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शोभिवंत मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक व राज अँक्वाचे संचालक – राजेश परब,संस्थेचे अध्यक्ष- सुहास सावंत,सदस्य- मुरारी पाळेकर,रघुनाथ परब,सुनिल इस्वलकर,संजय खानविलकर,राजेश जाधव,शशांक तळेकर,राजू चौधरी,भानूदास आचरेकर आदी मत्स्य उत्पादक शेतकरी व इतर उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरु डॉ. संजय सावंत तसेच डॉ. शिरधनकर यांचे सुहास सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर शेवटी आभार राजेश परब यांनी मानले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!