कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताहामध्ये इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण दिवस साजरा
कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी सय्यद .कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेत शिक्षण सप्ताह निमित्त काल सहाव्या दिवशी शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत व्हावे तसेच शालेय परिसर, सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे काळाची गरज आहे या याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.शालेय परिसरात वृक्षारोपण करून .विद्यार्थ्यांना आपल्या घराभोवती व परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन केले.कार्यक्रमाला कॉलेज प्रमुख श्री .उत्तम पाटील,श्री.प्रसाद कोलगावकर श्रीम.अश्विनी दळवी, श्रीम. आलेखा नाईक इ.शिक्षक वर्ग तसेच इयत्ता अकरावी व बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.प्रशालेचे प्र.प्राचार्य श्री.सुर्यकांत भुरे यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम हाती घेण्यात आला.