वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास २९ रोजी घेराव
*🛑वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास २९ रोजी घेराव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२३:-* तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नळपाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गणेश शाळेत मूर्तिकारांची रात्रंदिवस लगबग सुरू झाली आहे. अशातच वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणांवर याचा विपरित परिणाम होत आहे. तसेच वाढीव बिलांबाबत नांदगाव पंचक्रोशीतील वीज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेतली असून नांदगाव येथील उपअभियंता पंडित यांची भेट घेत निवेदन दिले आहे. दरम्यान, आठ दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सोमवार, २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. नांदगाव येथील कार्यालयात घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, प्रदीप हरमळकर, नांदगाव तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, तोंडवली- बावशीचे माजी उपसरपंच अशोक बोभाटे, संतोष मिराशी बुवा, आयनल माजी सरपंच बापू फाटक, राजू खोत, योगेश सदडेकर, भूपेश मोरजकर, मारुती मोरये, रामा मोरये, रघुनाथ लोके, विजय आचरेकर, कमलेश पाटील, कृष्णा वायंगणकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

