दुसरा ‘आपला दवाखाना’ रद्द होण्याची भीती..
*🛑 दुसरा ‘आपला दवाखाना’ रद्द होण्याची भीती..*
*🛑 कणकवलीत जागा उपलब्ध झाल्यास सुरू होऊ शकतो दवाखाना..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२३:-* कणकवली शहरासाठी ‘आपला दवाखाना’ (शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र) अंतर्गत दोन केंद्रे मंजूर झालीत. पैकी एक दवाखाना शाळा नं. ४ च्या जुन्या इमारतीत सुरू करण्यात आला आहे. मात्र, दुसरा दवाखाना सुरू करण्यासाठी अद्याप अपेक्षित जागेची प्रतिक्षा आहे. यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून सूचविण्यात आलेली जागा रुग्णांना जाण्या-येण्याच्यादृष्टीने सोईची नसल्याने या दवाखान्यासाठी नवीन जागेची प्रतिक्षा आहे. तसे न झाल्यास भविष्यात मंजूर असलेला हा दवाखाना रद्द होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. कणकवली शहरासाठी दोन आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर झालेली होती. अर्थात ग्रामीण भागातील उपकेंद्रांच्या धर्तीवर ही केंद्रे मंजूर झालेली होती. मात्र, नंतरच्या टप्यात या आरोग्यवर्धिनी केंद्रांऐवजी आपला दवाखाना ही संकल्पना पुढे आली. यात एक डॉक्टर, एक नर्स, एक एमपीडब्ल्यू व एक शिपाई अशी पदे मंजूर आहेत. यापैकी एक आपला दवाखाना पंचायत समितीच्या मागील बाजूला असलेल्या शाळा नं. ४ च्या इमारतीत काही महिन्यांपासून सुरू
आहे. दरम्यान, शहरासाठी दुसरा आपला दवाखाना सुरू करण्याच्यादृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे जागा उपलब्धतेबाबत मागणी करण्यात
आली होती. नगरपंचायतीने बहुद्देशीय सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही केली. या जागेची काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणीही केली. मात्र, रुग्ण सोईच्यादृष्टीने विचार केल्यास, जागा तळमजल्यावरच असणे आवश्यक आहे. मात्र, तशी जागा अद्याप उपलब्ध झालेली नाही. शासकीय जागा नसल्यास काही प्रमाणात भाडे देऊनही जागा उपलब्ध झाल्यास हा आपला दवाखाना सुरू होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जागा उपलब्ध होण्याची गरज आहे. तसे न झाल्यास मंजूर असलेला दुसरा आपला दवाखाना रद्द होण्याची भीती व्यक्त होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_