आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे दबंग नेतृत्व -दिनेश गावडे.
*🛑आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे दबंग नेतृत्व -दिनेश गावडे.*
*🛑आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे झुंजार नेतृत्व*
*🛑वाढदिवस अभिष्टचिंतन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२:-* सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील संस्थान काळापासून अत्यंत महत्त्वाचा असा भाग म्हणजे आंबोली- चौकूळ. निसर्गरम्य ठिकाण म्हणून जागतिक पर्यटन नकाशावर या दोन्ही गावांची ओळख आहे पर्यटनदृष्ट्या आंबोली चौकुळ गावाचा हवा तसा विकास झाला नाही किंबहुना निर्सगाने भरभरून देऊन सुद्धा ही गावे विकासा पासून वंचित राहिलीत व रामभाऊ गावडे, चंद्रकांत गावडे यांच्यानंतर या गावात तसे नेतृत्व निर्माण झाले नाही, म्हणून या पर्यटन गावाचा विकास व्हावा,गावाला वैभव प्राप्त व्हावे यासाठी चौकुळ गावात जन्मलेला मात्र कर्मभूमी कोल्हापूर असलेला एक उमदा युवक गेली पंधरा वर्षे धडपडत आहे,सावंतवाडी तालुक्यापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर चौकूळ गाव आहे. या गावची स्थिती विकासात्मक दृष्ट्या अत्यंत दयनीय आहे. अशा या भागाचा विकास आणि येथील जनतेच्या वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, या अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्वाचा अभाव आहे. आणि हा अभाव दूर करण्याच्या दृष्टीने युवा नेतृत्व दिनेश शिवाजी गावडे हे आंबोली चौकूळ जिल्हा परिषद मतदार संघाच्या जनतेतले हक्काचे प्रतिनिधी म्हणून गेल्या दहा वर्षापासून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तळमळीने भाग घेत आहेत. रात्री अपरात्री स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता जनतेच्या सेवेसाठी हजर असतातच. साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आणि गावातील जनतेच्या विकासाचं स्वप्न मनाशी बाळगून समाजकारणात दिनेश गावडे यांनी एन्ट्री केली आहे. समाजकारण, राजकारण या माध्यमातून जिल्हा परिषद मतदार संघात एक नव उगवतं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. चौकुळ, आंबोली जिल्हा परिषद मतदार संघाला सावंतवाडीतच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळच महत्त्व आहे. या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेले सावंतवाडी पंचायत समितीचे माजी
सभापती रामभाऊ गावडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरत गावडे यांच्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे, जि. प सदस्य प्रकाश गावडे या सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रातीलमातब्बर अशा या व्यक्तींच्या कार्यपद्धतीला साजेशे कार्य तब्बल दहा वर्षानंतर दिनेश गावडे यांच्या रूपाने पुढे येत आहे. गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर येथील व्यवसाय सांभाळत आपल्या मूळ चौकूळ, आंबोली भागात कार्य करण्यासाठी ते तत्पर झाले आहेत. दिनेश गावडे यांचा स्वभाव एकदम प्रेमळ, शांत संयमी ..अशाच स्वभावामुळे युवा पिढीची भक्कम साथ दिनेश गावडे ह्यांना आहे,व युवाईंच्या गळ्यातील ताईत दिनेश गावडे बनले आहेत,गेली दहा वर्षे ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे,वह्या वाटप,शालेय शैक्षणिक साहित्य वाटप,बचत गटांना आर्थिक मदत, धार्मिक कार्यक्रमांना अन्नदान ते नेहमीच करीत असतात,अगदी आंबोली,चोकुळ,केसरी,दाणोली,देवसू,सोतोळी,बावळाट,विलवडे कोनशी,दाभिल,भालावल,या गावांमध्ये युवकांची भक्कम फळी त्यांनी उभी केली आहे वेळ प्रसंगी हक्काचे एकच नाव म्हणून दिनेश गावडे यांच्या कडे पाहिले जाते, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिकांयची असा चंग त्यांनी बांधला आहे व कार्यकर्त्याची भक्कम साथ त्यांना आहे.त्यांचा आज २२ जुलैला 3८ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या एकंदरीत दानशूर व्यक्तिमत्त्वाच्या पैलूवर टाकलेला हा प्रकाश… !
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_