बिळवस येथे शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी
*🛑बिळवस येथे शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-२०:-* मालवण तालुक्यातील बिळवस दत्त मंदिर येथे येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले असून यात त्यांचे सुमारे एक लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रशासनाकडून रितसर पंचयादी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे या गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने ही नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी चंद्रकांत पाताडे यांच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केली आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांत आंबा पाताडे (रा. बिळवस- मधलावाडा) या शेतकऱ्याचे तीन बैल नेहमीप्रमाणे बिळवस दत्त मंदिरनजीक चरण्यासाठी आले होते. यावेळी येथे असलेल्या वीज वितरणच्या वीज खांबानजीक बैल आले असता या ठिकाणी वीज खांबातून वीज प्रवाह चालू झाल्या. थेट या वीज खांबाच्या मुळाशी जमिनीतही वीज प्रवाह सुरू होता. तसेच या ठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे थेट पाण्यामध्ये वीज प्रवाह सुरू होता. या ठिकाणी हे तिन्ही बैल आले असता या तिन्ही बैलांना विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला. याबाबत चंद्रकांत पाताडे यांनी वीज वितरणशी संपर्क साधल्यानंतर वीज प्रवाह खंडित करण्यात आला. याबाबतची खबर मिळताच सरपंच मानसी पालव, ग्रा. पं. सदस्य संतोष पालव, स्थानिक तलाठी आर. आर. तारी, ग्रामसेवकं युगल प्रभूगावकर, पशू वैद्यकीय अधिकारी ए. एस. शिरसाट, वीज वितरणचे माने, ग्रामस्थ भावेश पालव, माजी पोलीस पाटील गोविंद सावंत, साळस्कर आदींनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. संबंधित प्रशासनाच्यावतीने एक लाख ६४ हजार रुपयांची नुकसान भरपाई पंच यादी घालण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
