स्वाभिमानी कामगार संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेला बांधकाम कामगारांना सहकार्य करावे..!
*🛑स्वाभिमानी कामगार संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेला बांधकाम कामगारांना सहकार्य करावे..!*
*🛑90 दिवस काम केल्याच्या दाखल्यास राज्यस्तरीय ग्रामसेवक युनियनकडून नकाराच्या पार्श्वभूमीवर संघटनेकडून पत्राद्वारे करण्यात आले आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१९:-* ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास राज्य ग्रामसेवक युनियनने बांधकाम कामगार मंडळास पत्राद्वारे नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेस स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्याचे आवाहन विनंती पत्राद्वारे करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचेकडील सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांना दि.09-07-2024 रोजीच्या सादर पत्रान्वये 90 दिवसांचा दाखला देण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील काही ग्रामसेवक संघटनेच्या निर्णयाचा आधार घेऊन बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी दाखला देण्यास विरोध करताना दिसत आहेत.
बांधकाम कामगारांची होणारी गैरसोय व नुकसान पाहता स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना दाखला देऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी स्थानिक प्राधिकरणाकडून 90 दिवस काम केलेबाबतचा दाखला देण्याचे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन परिपत्रक दि. 22-09-2017 व 16-11-2015 नुसार नियमाधीन असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीकडील ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आतापर्यत बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी आवश्यक दाखला देवून सहकार्य केल्याचे उल्लेखित केले आहे. मात्र दि.10 जुलै 2024 पासून काही ग्रामसेवक राज्यस्तरीय संघटनेने विरोध केल्याचे सांगत दाखला देण्यास नकार देत असल्याने कामगारांना योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.वास्तविक संघटनेने दाखला देत असताना शासनाकडून सूचक नियमावली नसल्याचे कारण देत दाखला देण्यास नकार दिलेला असला तरीही ग्रामविकास विभागाकडील शासन परिपत्रकांमध्ये दाखला देण्याची कार्यवाही करताना कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तरीही सुद्धा संघटनेच्या भूमिकेचा आदर ठेवून बांधकाम कामगारांना मंडळाकडून वरिष्ठ पातळीवर पुढील कार्यवाही होईस तोवर बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीनुसार दाखला देण्याची विनंती वजा आवाहन श्री गावडे यांनी पत्रातून केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या असून शासनाकडून कष्टकरी कामगार वर्गासाठी पुढील महिना-दीड महिना चांगल्या सुविधा व कल्याणकारी योजनेंची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केली जाणार आहे. असे असताना आपल्या राज्यस्तरीय संघटनेकडून दिलेल्या उच्चस्तरीय पत्रावर उचित कार्यवाही होवून पुढील निकष अमलांत येई पर्यंत स्थानिक पातळीवर दाखला देवून कष्टकरी कामगारांना सहकार्य करावे अशी भूमिका स्वाभिमानी संघटनेने ग्रामसेवक संघटनेपुढे ठेवली आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक व विकासात्मक बाबींची निर्मिती करणारे बांधकाम कामगार हे दोन्ही ग्रामविकासाचे अविभाज्य घटक असल्याने बांधकाम कामगारांच्या होणाऱ्या गैरसोयीसाठी ग्रामसेवक संघटना नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_