शिंदे सरकारचं ‘कोकणरत्न’ शिक्षणमंत्री दिपक केसरकर
*शिंदे सरकारचं ‘कोकणरत्न’ शिक्षणमंत्री दिपक केसरकर*
*सावंतवाडी दि.१८:-* सावंतवाडी हे परमेश्वराला पहाटे पडलेले स्वप्न असेल, तर साक्षात परमेश्वराच्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी तन-मन- धन अर्पण करून दिवस रात्र झटणारे शिल्पकार म्हणजे शिक्षणमंत्री मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर. ३५० वर्षापूर्वीची परंपरा लाभलेल्या आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज व शिवरामराजेंचा वारसा अभिमानाने सांगणाऱ्या सावंतवाडी शहराचे सभ्य, सुसंस्कृत व विनम्र स्वभाव असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दीपकभाई केसरकर कोकणाबरोबर महाराष्ट्राचेही प्रतिनिधित्व करतात मुंबई शहर पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना कोकणवासीयांचे स्वप्न तसेच महाराष्ट्र राज्य विकासाकडे नेण्याचे काम प्रामाणिकपणे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय नामदार श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करीत आहेत
सलग तिसऱ्यांदा निवडून जात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी हॅट्रिक केली पूर्वीच्या सरकारमध्ये वित्त व गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होऊन शिंदे सरकार मध्ये सामील झाले त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वाच्या शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली शिक्षण मंत्री म्हणून मुलांना चांगले शिक्षण मिळावे अशा शिक्षण तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन शिक्षण क्षेत्रात नवे शैक्षणिक धोरण अमुलाग्र बदल घडवून आणला जेणेकरूनसर्वसामान्य पालकांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता येईल भावी तरुण पिढी सुसंस्कृत बनेल याची काळजी घेतली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून विकासाच्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने समाजासाठी काम करायचे असेल तर राजकारण हे एक माध्यम आहे दीपकभाईने गोरगरीब जनतेच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी राजकारण केले, तळागाळातील सर्वसामान्य माणूस हा नेहमीच त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला जिल्ह्यातील महिला, युवक, कामगार वर्ग, मच्छीमार अशा सर्वसामान्य जनतेची आर्थिक उन्नती होऊन त्यांची कुटुंबे सुखी करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध प्रकल्प राबविले जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात अनेक माध्यमातून निधी उपलब्ध करून जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.
कोकणाबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची धमक दीपकभाईच्या संकल्पनेतून साकारलेली आहे विकास प्रक्रियेत लोकांचा सहभाग असायला हवा सिंधुदुर्गातील नैसर्गिक साधन संपत्ती, आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता येथे पर्यावरण पूरक उद्योग उभा राहिला हवे प्रामुख्याने शेती, फलोत्पादन व मासेमारीवर अवलंबून असलेल्या कोकण व जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी दीपकभाईंनी जे बीज रोवले आहे त्याची गोड गोड फळे भविष्यात कोकणवासीयांना चाखायला मिळतील यात तिळमात्र शंका नाही. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीच्या पलीकडे नेणारे धोरणात्मक निर्णय योजना, शिक्षण क्षेत्रातील अमुलाग्र बदल, कोकणचा विकास, मतदार संघातील आंबोली गेळे, कबुलायतदार ऐतिहासिक निर्णय, सिंधूरत्न योजना, जर्मन प्रशिक्षण वर्ग अशा अनेक माध्यमातून घेतलेले सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे महिला तरुण वर्ग हिताचे निर्णयत्याचबरोबर पक्ष संघटना वाढीकडे लक्ष घालून शिवसेना (शिंदे गट) पक्षाची संघटनेतील प्रवक्ते व नेते म्हणून लक्ष घालून संघटनात्मक बांधणी करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी भरीव अशी कामगिरी केली अशा ‘कोकणरत्नाच्या’ नेतृत्वाला तमाम जनतेकडून व शिवसैनिकांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!

