चिपीतील तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू
*🛑चिपीतील तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि-१७:-* चिपी-भरणीवाडी येथील पांडुरंग दशरथ वाक्कर (५०) हे तेथीलच ओहोळाला आलेल्या पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते रात्री आठ या मुदतीत घडली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची खबर प्रकाश पुरुषोत्तम राणे (रा. कवठी) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. पांडुरंग वाक्कर मोलमजुरी करायचे. काल ते प्रकाश राणे यांच्याकडे कामाला गेले होते. तेथून ते दुपारी आपल्या घरी यायला निघाले. त्यांच्या घरापासून साधारण एक किमी अंतरावर ओहोळ आहे. या ओहोळातून येत असताना त्यांना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा तोल जाऊन ते त्या पाण्यात पडले आणि वाहून गेले. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. काल रात्री आठच्या सुमारास ते त्या पांडुरंग वाक्कर ओहोळाच्या पाण्यातून येत होते. तेथून साधारण दोनशे मीटर अंतरावर ते ग्रामस्थांना मृतावस्थेत आढळले.
निवती पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच हवालदार पंढरीनाथ भांबरे यांनी पोलीस नाईक दीपक गावडे, होमगार्ड ओंकार सर्वेकर यांच्या मदतीने पंचनामा केला.
पदाधिकारी-ग्रामस्थांची धाव घटना समजताच शिवसेना (शिंदे गट)
उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, चिपीचे ग्रा.पं. माजी सदस्य संदेश करंगुटकर, मोहन वाक्कर, राजू राणे, राजू करंगुटकर व अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात पांडुरंग यांचा मृतदेह रात्री उशिरा ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वस्त यांनी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पांडुरंग मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधार हरपला आहे. शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पांडुरंग यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व अन्य परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_