कुडाळकोकणमहाराष्ट्र

रेल्वे स्थानकाच्या शेडमध्ये कडावल येथील तरुणाचा मृतदेह

*🛑रेल्वे स्थानकाच्या शेडमध्ये कडावल येथील तरुणाचा मृतदेह*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१६:-* येथील रेल्वे स्थानकावरील बाहेरच्या शेडमध्ये कडावल येथील प्रथमेश राजाराम दुखंडे (३५) सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृतावस्थेत आढळले. याबाबतची खबर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस प्रवीण राजाराम मोरे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली कुडाळ रेल्वे स्थानकाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये प्रथमेश दुखंडे झोपले होते. सकाळी १० वाजता त्या शेडमध्ये कुणीतरी झोपले असल्याचे स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. परतु, काहीच प्रतिसाद दिला नाही. नंतर श्रीमती नाईक यानी कणकवली येथे रेल्वे सुरक्षा बलाला याबाबतची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमोद मोरे कुडाळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले व त्यांनी पाहणी केली असता सदर व्यक्ती काहीच हालचाल करीत नव्हती. म्हणून त्यांनी मग कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार अनिल पाटील व स्वप्नील चव्हाण यांनी त्या व्यक्तीची तपासणी केली असता, त्यांच्या खिशात कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राची चिठ्ठी मिळाली. त्यावरुन त्याची ओळख पटली. त्याचे नाव प्रथमेश दुखंडे असल्याचे स्पष्ट झाले. परतु, ते मयत झाले होते. पाटील व चव्हाण यांनी पंचनामा केला. नंतर येथील ग्रामीण रुग्णालय येथील शवागृहात वैद्यकीय अधिकारी डॉ. वस्त यांनी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह दुपारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रथमेश अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ व अन्य परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!