अत्याचारप्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी
*🛑अत्याचारप्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* ओळखीचा फायदा घेत तालुक्यातील एका विवाहितेवर अत्याचार करून पीडित विवाहितेसह तिच्या मुलीला दुखापत तसेच गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या धाकू नवलू पाटील (२८) याला आज शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित महिलेने फिर्याद नोंदविताच सावंतवाडी पोलिसांनी संशयित धाकू पाटील याला शुक्रवारी अटक केली होती. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वेदिका राऊळ व तपासी अधिकारी माधुरी मुळीक यांनी बाजू मांडली. ११ जुलैला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. एका शासकीय योजनेचा अर्ज भरण्यासाठी व पासपोर्ट फोटो काढण्यासाठी संशयित आपल्या दुचाकीवरून पीडित विवाहिता व तिची मुलगी यांना घेऊन गेला. तेथून पुन्हा घरी परतत असताना विवाहितेच्या मुलीसमोरच संशयिताने अत्याचार केला. तसेच संशयिताने पीडितेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत संशयित जंगलात पसार झाला. पीडितीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भा. न्या. सं. २०२३ कलम ७४, ७५, (१) ७६, १२५, (अ), ३५१ (३), ६४ (१), ६४ (२) एफ, १०९ जे. जे. एक्ट २०१५ कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. संशयिताला शनिवारी न्यायालयात हजर केले असता १५ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्हयात संशयित धाकू पाटील याने वापरलेली दुचाकी जप्त करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

