आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्र

विवाहितेचा मृतदेह बंधाऱ्यात आढळला

*🛑विवाहितेचा मृतदेह बंधाऱ्यात आढळला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१३:-* शुक्रवारी सकाळच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर पडलेल्या कणकवली तेलीआळी येथील सौ. स्वरानी सचिन नेरकर (३३) या दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास येथील मराठा मंडळानजीकच्या गडनदीवरील केटी बंधाऱ्याच्या पाण्यात मृतावस्थेत तरंगताना आढळल्या. स्वरानी नदीमध्ये कशा पडल्या, हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरानी शुक्रवारी सकाळी ११ वा. सुमारास ‘कचेरीत जाते’ असे सासूला सांगून घराबाहेर पडल्या. पती सचिन नेरकर हे देखील कामावर निघून गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी आलेल्या सचिन यांनी पाहिले असता स्वरानी घरी
नव्हत्या. आईला विचारणा केली असता स्वरानी कचेरीत गेल्याचे समजल्याने सचिन यांनी कचेरीत तसेंच स्वरानी हिच्या माहेरीही जाऊन पाहिले. मात्र, स्वरानी दिसूनआल्या नव्हत्या. दरम्यान, दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास येथील मराठा मंडळानजीकच्या गडनदी बंधाऱ्यावरून जात असलेले वागदे सरपंच संदीप सावंत यांना बंधाऱ्यानजीक पाण्यामध्ये महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह वाहत येऊन तेथे एका खांबाला अडकला होता. सावंत यांनी कळविल्यानुसार कणकवली
पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक
राजकुमार मुंढे, हवालदार
सौ. स्वरानी नेरकर मिलिंद देसाई, पोलीस नाईक मनोज गुरव, वागदे पोलीस पाटील सुनील कदम, शिवाजी घाडीगावकर आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, ग्रामस्थांनी मृतदेह नदीपात्राबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. तेथील पाहणीत मृतदेह स्वरानी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. स्वरानी या पूर्वाश्रमीच्या स्वरानी सुनील कामत (रा. कणकवली – विद्यानगर) असून त्या साधारण चार वर्षांपूर्वी कणकवली नगर पंचायत येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होत्या. जुलै २०२१ मध्ये त्यांचा विवाह कणकवली नगर पंचायतीचे बांधकाम अभियंता सचिन चंद्रकांत नेरकर (४८, रा. कणकवली – तेलीआळी), यांच्याशी झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्ती, विवाहित बहीण, सासू, दिर, भावजय, विवाहित नणंद, भाचा असा परिवार आहे. दरम्यान पती सचिन यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!