कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

गणेशोत्सवात बोरिवलीहून कोकणसाठी रेल्वे !

*🛑गणेशोत्सवात बोरिवलीहून कोकणसाठी रेल्वे !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि- १०:-* मुंबई उपनगरात लाखो प्रवासी कोकणातील असून त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी दादर, ठाणे किंवा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जावे लागते. यात • स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच उपनगर प्रवाशांसाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित खासदार व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे कोकण मुंबई सामाजिक सेवा प्रतिष्ठानतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. गोयल यांनी गणेश चतुर्थीत बोरिवलीहून उपनगरातील प्रवाशांसाठी कोकणात गाड्या सोडण्यात येतील, अशी ग्वाही प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिली. चारकोप येथील पियुष गोयल यांच्या जनता दरबारवेळी प्रतिष्ठानतर्फे त्यांची भेट घेण्यात आली. बोरिवली, चारकोप येथील प्रवाशांसाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा मंडळ, रायगड जिल्हा एकात्मता ट्रस्ट या संस्थांनी रेल्वे प्रशासनाशी केलेला पत्रव्यवहारही जोडला. गोयल यांनी, गौरी-गणपती सणाला या सेवेचा लाभ मुंबई उपनगरातील कोकणवासियांना निश्चित मिळेल, अशी ग्वाही दिली. याकामी सहकार्य करणारे आमदार योगेश सागर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, बाळा तावडे, योगेश पडवळ, सचिव सुरेंद्र नारकर, प्रमोद गुजर, महेश माणगावकर, रेश्मा टक्के, प्रमोद घाग, रुपाली चाळके, संतोष जाधव, श्रद्धा नारकर, सुलभा जोशी आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!