तेलींची अवस्था विजणा-या दिव्यासारखी झालीय
सावंतवाडी दि. ०९-: केवळ आमदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी उपरे समाजसेवक राजन तेली खोटे आरोप करून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करत आहेत संच मान्यतेची जुने कागदी घोडे नाचवून पुर्ण माहिती न घेता ते शिक्षकांची व नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. तेलींची अवस्था विजणा-या दिव्यासारखी झाली असून दिवा विझायला जेव्हा येतो तेव्हा त्याची वात जास्त फडफडते अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
जिल्हाध्यक्ष अशोक दळवी,महिला जिल्हा संघटक अँड. नीता कविटकर, तालुका प्रमुख नारायण राणे, प्रेमानंद देसाई, भारती मोरे, बाबू कुडतरकर, यांनी राजन तेली यांच्या विरोधात पत्रक प्रसिद्ध दिले आहे त्यात असे म्हटले की,राजन तेली ज्या संचमान्यतेच्या निर्णयाबाबत कोल्हे कुई घालून जिल्हयातील मुख्याध्यापकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तो निर्णय केंद्रशासनाच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या धर्तीवर तयार केलेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ च्या आधारे असून हा शासन निर्णय करण्यापुर्वी मा. अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन सदर समितीच्या अभ्यासानुसार व मा. शिक्षण आयुक्त यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पारित करण्यात आलेला आहे.कोणताही शासन निर्णय काढताना तो सर्वसमावेशक व सर्वांना विश्वासात घेऊन शासकीय निकष आणि शासकीय धोरणाचा विचार करुन काढला जातो. त्यामध्ये काही चुकीचे असेल तर विहित पद्धतीने त्यात बदलही करता येईल. संघटनेच्या मागणीनुसार त्यावर यापुर्वीच कार्यवाही सुरु झालेली आहे. यथावकाश त्यात नियमानुसार बदलही होईल परंतु उपर्या राजन तेली केवळ मंत्री केसरकर यांची बदनामी करणे व विरोध करण्याच्या हेतुने नाहक टीका करत आहे. जुने कागदी घोडे नाचवून पुर्ण माहिती न घेता आपली पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. शाळांचा गुणात्मक विकास असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध प्रकारचे उपक्रम असतील किंवा जर्मन भाषा शिकून जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रकल्प असेल अशा अनेक संधी मंत्री केसरकर यांच्यामुळे जिल्हयातील लोकांना उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय असेल किंवा हजारोंच्या संख्येने शिक्षक भरतीचा निर्णय असेल, असे अनेक मोठे निर्णय मंत्री म्हणुन केसरकरांनी घेतलेले आहेत व त्याची अमलबजावणीही सुरु आहे. मात्र तेलींची अवस्था विजणा-या दिव्यासारखी झाली आहे. दिवा विझायला जेव्हा येतो तेव्हा त्याची वात जास्त फडफडतो त्याचप्रमाणे ते केसरकर यांच्यावर टीका
करून शिक्षकांची व नागरीकांची दिशाभूल करीत
आहेत.