सावंतवाडी लायन्स क्लबचे सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध समाज हिताचे उपक्रम*
*सावंतवाडी लायन्स क्लबचे सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध समाज हिताचे उपक्रम*
सावंतवाडी दि. 3 :- सावंतवाडी लायन्स क्लब सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या वर्षात मेडिकल एड सेंटर, नेत्र शस्त्रक्रिया , पर्यावरण,युथ अवेरनेस असे विविध समाज हिताचे उपक्रम राबवणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष अमेय पै आणि सेक्रेटरी ला.अभिजीत पणदूरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. रिजन चेअरमन ला .गजानन नाईक यांनी प्रास्तविकात सावंतवाडी लायन्स क्लब हा 1975 साली स्थापन होऊन आता पन्नास वर्षात पदार्पण करीत आहे या वर्षासाठी लायन्स क्लबची नुतन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी अमेय पै आणि सेक्रेटरीपदी एड. अभिजीत पणदुरकर ,खजिनदार पदी सुनील दळवी यांची निवड करण्यात आली आहे . असे जाहीर केले.
येत्या वर्षात लायन्स क्लबच्या प्रांतपालांच्या ॲक्शन प्लॅन नुसार विविध सामाजिक हिताचे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
लायन्स क्लब तर्फे आरोंदा येथे मेडिकल एड सेंटर , हॉस्पिटल सारखा मोठा उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरीब नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी आणि आवश्यक तर नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचे हिताचे विविध उपक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे, महिलांसाठी युवतींसाठी तज्ञांचे मार्गदर्शन, पर्यावरणा चे दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना आदी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती नूतन अध्यक्ष अमेय पै यांनी दिली .
पत्रकार परिषदेला क्लबचे संचालक सर्वश्री. रविकांत सावंत संदेश परब, महेश पाटील, बाळासाहेब बोर्डेकर आदी उपस्थित होते .
लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा पदाधिकार ग्रहण आणि दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भगवती सभागृह रेल्वे स्टेशन रोड मळगाव येथे आयोजित करण्यात आला असून लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल सुनील सुतार आणि एडवोकेट विजय जमदग्नी प्रमुख पाहुणे आणि दीक्षा अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

