अर्बन बँक विलीनीकरणामुळे बँकेच्या सभासदांचे हक्क संपुष्टात !
*🛑अर्बन बँक विलीनीकरणामुळे बँकेच्या सभासदांचे हक्क संपुष्टात !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव बँकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. सावंतवाडी अर्बन बँकेचे विलिनीकरण झाले तरी सावंतवाडी अर्बन बँकेच्या सभासदांचे व शेअर्सचे ठाणे येथील टीजीएस बँकेत हस्तांतरण होणार नाही. हस्तांतरण होण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न केले होते. परंतु, या प्रयत्नांना यश मिळालेले नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांना टीजीएस बँकेत घेण्यात येणार आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांना काही महिने आहे, त्या पगारावर काम करावे लागणार आहे. दरम्यान, सावंतवाडी अर्बन बँकेच्या सभासदांचे दहा कोटी रुपये मूल्य असलेले एकूण शहर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर यांनी विलिनीकरणामुळे बँकेच्या सभासदांचे हक्कच संपुष्टात आले आहेत, असे स्पष्ट केले. या संदर्भात दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाबाबत गेली दहा वर्षे चर्चा सुरू होती. परंतु, या संदर्भात निर्णय होत नव्हता. सावंतवाडी अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले. सहा महिन्यासाठी हे निर्बंध लादले होते. या अंतर्गत या निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी सावंतवाडी अर्बन बँकेला शहरच्या माध्यमातून तीन कोटीचे टार्गेट होते. संचालक मंडळाने हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. साधारण दीड कोटी रुपये सभासदांच्या माध्यमातून जमा करण्यात आले. परंतु, टार्गेट पूर्ण झाले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची टांगती तलवार होती. अशातच सावंतवाडी अर्बन बँक ठाणे येथील टीजीएस बँकेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परंतु, सावंतवाडी अर्बन बँकेचे सभासद व त्यांच्या शहराचे हस्तांतरण होणार नाही. हे हस्तांतरण होण्यासाठी प्रयत्न झाला. परंतु, त्याला टीजीएसकडून मान्यता देण्यात आले नाही. त्यामुळे सुमारे दहा कोटीच्या शेअर्सचे काय होणार? हा प्रश्न आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

