कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

काजू हमी भावाचा पावसाळी अधिवेशनात ठराव घ्या; अन्यथा कोकणातील शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन छेडणार

*🛑काजू हमी भावाचा पावसाळी अधिवेशनात ठराव घ्या; अन्यथा कोकणातील शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन छेडणार*

*🛑सामाजिक कार्यकर्ते व ओसरगाव सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप तळेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनिल आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०१:-* तळकोकणातील शेतकऱ्यांचे प्रमुख अर्थकारण असलेल्या काजू बी ला हमीभाव देण्यात न आल्याने शेतकरी नाराज आहेत. तरी येत्या पावसाळी अधिवेशनात जीआय मानांकित काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमी भाव देण्याचा ठराव मंजूर करावा; अन्यथा कोकणातील शेतकरी संघटनांच्या वतीने शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करु, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व ओसरगाव सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप तळेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री, पालकमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री यांना सनदशीर मागनि वारंवार निवेदने देऊन, चर्चा करून व त्यातून समाधान न झाल्याने धरणे आंदोलने, रास्ता रोको आदी मागनि शासनाला निवडणूक कालावधीत कोंडीत पकडून या वर्षापुरता ११०रु. प्रतिकिलो काजू दर नाईलाजाने स्वीकारला. जानेवारीतील अवकाळी पाऊस व बदललेल्या हवामानामुळे यावर्षी काजू उत्पादन ३० ते ३५ टक्केच झाले. त्यात व्यापाऱ्यांनी उतरवलेले दर व उत्पादन कमी यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आंदोलनाचे शस्त्र उचलावे लागले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी काजू बी वरील आयात शुल्क २० टक्के इतके पूर्ववत करण्यासंदर्भात तत्कालीन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. लोकसभा निवडणुकीत हे दोघेही निवडून आल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यासंदर्भात लवकरच खासदार नारायण राणे यांची भेट घेतली जाणार असल्याचे प्रदीप तळेकर यांनी सांगितले. गोवा सरकारने २०२३ मध्ये काजू बी ला प्रतिकिलो १५० रुपये हमीभाव दिला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही राज्य शासनाने असा हमीभाव घ्यावा, त्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात एकमुखी ठराव मंजूर करावा,अशी मागणी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळ पास ७० हजार हेक्टरच्या वर काजू लागवडीचे क्षेत्र आहे. कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर फळबागायती असून सध्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर मजुरीचे वाढलेले दर, खतांचे वाढलेले दर, फवारणी औषधे यांचे वाढलेले दर, प्रचंड वाढलेली महागाई पेट्रोल डिझेल गॅस यांचे वाढलेले दर यामुळे वाहतूक भाड्यामध्ये होणारी वाढ . वातावरण बदलामुळे आंबा काजू पीक यांचे पिकांवर होणारी घट यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. सध्या बाजारपेठेत १०० ते ११० रुपये प्रति किलो या दाराने काजू बी खरेदी केली आहे. ११० रुपये प्रति किलो हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसून शासनाने काजूच्या दाराकडे लक्ष घालून हा दर २०० रुपये प्रति किलो करावा अशी मागणी केली आहे.अन्यथा शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व ओसरगाव सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप तळेकर यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!