कोकणशासकीयशैक्षणिकसिंधुदुर्ग

डी.एडच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.08: सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतील. सदरची प्रवेश प्रक्रिया पुढील प्रमाणे राबविण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश होईल. दिनांक 11 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2021 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, दिनांक 11 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे, दिनांक 11 जानेवारी 2021 ते 16 जानेवारी 2021 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिन मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वतःचे प्रवेशपत्र काढून घेणे, दिनांक 11 जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2021 प्राचार्य, संबंधित अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वतःचे लॉगिन मधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲडमिट करून घेणे. सदर प्रवेशासाठीची पात्रता पुढील प्रमाणे आहे. शैक्षणिक पात्रता – इयत्ता 12 वी उत्तीर्ण, खुल्या प्रवर्गासाठी किमान 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह, प्रवेश अर्ज शुल्क खुल्या संवर्गासाठी 200 रुपये व खुला संवर्ग वगळून इतर सर्व संवर्गांसाठी 100 रुपये. विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या http://www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात असे अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व सनियंत्रण समिती पुणे तथआ संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हे कळवितात.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!