महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा
*🛑महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा*
*🛑जिल्हाधिकारी यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पत्र :रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही अपघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२९*:-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघात होत असल्याबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी निवेदन दिले आहे. त्याअनुषंगाने झाराप- कलमठ ते खारेपाटण या मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करावी, असे पत्र जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ झाराप-कलमठ तसेच कलमठ-खारेपाटण या रस्त्यांच्या बाजूची गटारे न मारल्याने रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला पाणी साचून पाण्याबरोबर रस्त्यांकडेची माती रस्त्यावर येऊन अपघात होत असतात. तरी याबाबत उपाययोजना करावी. कणकवली तालुक्यातील टोल नाक्यानजीक’ ओसरगाव येथे जैतापकर कॉलनी रोडवर तसेच जैतापकर कॉलनीसमोरून जाताना ब्रीजवर,भंगसाळ नदीच्या ब्रीजवर, आंबडपालकडून रस्त्यावर जाताना ब्रीजवर व कुडाळ तालुक्यातील सत्यम हॉटेलनजीक तसेच सर्व्हिस रोडवर काळप यांच्या घरासमोरील रोडवर व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे साचलेले पाणी गाडीच्या पुढच्या काचेवर येऊन अपघात झाले आहेत. आतापर्यंत अनेक अपघात होऊन काहींचा मृत्यूही झाला आहे. याबाबत उपाययोजना करावी, असे म्हटले आहे. हुमरमळा येथे पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेज येथे पडलेल्या खड्यामुळे अपघात होत असतात. सदर खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. आरटीओच्या नियमाप्रमाणे स्पीड लिमिटचे बोर्ड तसेच वळण असल्याचे बोर्ड व गावाच्या नावाचा उल्लेख असलेले बोर्ड लावले गेलेले नाहीत. सदर बोर्ड लावण्याची कार्यवाही करावी. ठेकेदारांनी शेड्यूल ए व बीप्रमाणे वरील काम करणे गरजेचे आहे, असे त्यामध्ये नमूद केले आहे. तसे न केल्याने महामार्गावर अपघात झाले आहेत. महामार्गावर अपघात झाल्यास अॅम्ब्युलन्स व क्रेनची मदत ठेकेदाराने करायची आहे. ती केली जात नाही. रस्त्यावर हेल्पलाईन नंबर लावून अॅम्ब्युलन्स मागविण्यासाठी किमान दोन-दोन किलोमीटरवर बोर्ड लावण्याची गरज आहे. ते लावले गेले नाहीत. तसेच एखाद्या निरव वस्तीत अपघात झाल्यास मदत मिळणाऱ्या हेल्पलाईन बोर्डवर रुग्णालयाचा नंबर, ठेकेदाराचा नंबर, आरटीओचा नंबर, लगतच्या पोलीस स्टेशनचा नंबर, आपत्कालीन यंत्रणेचा नंबर नाही. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळत नाही. त्यामुळे ठेकेदारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यावर, रस्त्याकडेला पाणी साचल्याने भरलेल्या गाड्या मातीमध्ये रुतल्या जातात. त्यामुळे सदर तुंबणारे पाणी गटार काढून ओहोळ, नदी किंवा पाण्याच्या प्रवाहात सोडण्याची गरज आहे. याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करून कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_