साक्षात टस्कर अंगणात उभा
*🛑 साक्षात टस्कर अंगणात उभा*
*🛑 मोर्लेत सुतार कुटुंबियांनी अनुभवला थरार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴साटेली भेडशी, दि-२९*:-मोर्ले येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जंगली टस्कर हत्ती मोठ्याने चित्कार करत थेट घराच्या अंगणात दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना नामदेव सुतार यांच्या घरासमोर घडली. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याने भीतीने थरकाप उडालेल्या सुतार कुटुंबियांनी घराचा दरवाजा बंद करून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. तर तेथील लोकांनी टस्कराला हाकलण्यासाठी आरडाओरड सुरू केली. अखेर ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर टस्कर तेथून गेल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. जंगली हत्तींमुळे केर-मोर्ले परिसरातील लोक हैराण झाले आहेत. एरव्ही जंगलात फिरणारे हत्ती आता थेट लोकवस्तीत येऊन खुलेआम फिरत आहेत. त्यांना हाकलण्यासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करणे, त्यांच्यावर हल्ला चढविणे असे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यात काहीजण जखमीही झाले आहेत. त्यामुळे हत्तींची प्रचंड दहशत लोकांमध्ये आहे. असाच प्रकार शुक्रवारी नामदेव सुतार यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत मोर्ले गावात घडला. कातरवेळी सुतार यांच्या घराच्या अंगणात टस्कर हत्ती दाखल झाला. त्याचा चित्कार ऐकून साऱ्यांचाच थरकाप उडाला. समोर अंगणात हत्तीच्या रुपात भयंकर संकट पाहून सुतार कुटुंबियांनी. घरात कोंडून घेतले, जिवाच्या आकांताने त्यांनी आरडाओरड सुरू केली. एकीकडे भीतीने पोटात. गोळा आला असताना दुसरीकडे ‘गणपती बाप्पा मोरया’ असा गणरायाचा धावा करण्यापलिकडे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. तर गावकरी अंगणाबाहेरून हत्तीला पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर तासाभरानंतर तेथून हत्तीने काढता पाय घेतला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. जवळपास तासभर हा थरार सुरू होता. या घटनेमुळे मोर्ले परिसरात कमालीची दहशत पसरली असून आता गावात फिरणेही मुश्किल होऊन बसले आहे. त्यामुळे वनविभागाविरोधात लोकांमध्ये संतापाची भावना आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

