वनविभाग आणि तालुका पत्रकार संघातर्फे 100 झाडे लावली; जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे वृक्षारोपण
*वनविभाग आणि तालुका पत्रकार संघातर्फे 100 झाडे लावली; जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे वृक्षारोपण*
* KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
* ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*सावंतवाडी, दि-२६*:-झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहते त्यामुळे झाडे लावा आणि त्यांना जगवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले ते
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निरवडे येथे बोलत होते.सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि आजगाव वनपरिमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला यावेळी जांभूळ सुरू आणि वड, जांभूळ,सुरू आदीवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे शंभरहून अधिक झाडे यावेळी वनविभागाच्या जमिनीमध्ये लावण्यात आली.यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्याध्यक्ष गजानन नाईक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आजगाव वन परिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे माजी तालुकाध्यक्ष विजय देसाई तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे तसेच पाडलोस वनरक्षक अप्पासो राठोड इन्सुली वनरक्षक संग्राम पाटील,पाडलोस वनसेवक चंद्रकांत पडते आदी उपस्थित होते.
वड वृक्ष लावण्याची पद्धत त्याच्यापासून मिळणारे फायदे याची माहिती माजी अध्यक्ष विजय देसाई यांनी दिली. यावेळी जांभूळ वृक्षाचे महत्त्व आणि फायदे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी सांगितले तर वृक्ष लागवडीमध्ये अभिमन्यू लोंढे अमोल टेंबकर नरेंद्र देशपांडे यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी तर शेवटी तालुका पत्रकार संघाने वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल वनविभागाच्या वतीने पृथ्वीराज प्रताप यानी आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….*
_________________________
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..
_*
*_गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..
_*
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
* जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….
*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*संपर्क : +919405475712*
*मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
Tweets by LiveKokan
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_