प्रा.डॉ.रमाकांत गावडे यांचा सावंतवाडीत सत्कार
*🛑 प्रा.डॉ.रमाकांत गावडे यांचा सावंतवाडीत सत्कार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२५*:-बांदा येथील गोगटे -वाळके कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. रमाकांत सिताराम गावडे यांना राजस्थान येथील श्री.जे.जे.टी. विद्यापीठाकडून ‘ कॉमर्स या विषयात ‘विद्या वाचस्पती’(पीएच.डी.) पदवी प्राप्त झाल्याबद्दल न्यु सबनीसवाडा सावंतवाडी येथील डोंगरे पाणंद मधील मॉडर्न कॉलनी येथील रहिवासी यांनी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कॉलनीतील रहिवाशी आणि माजी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्याला मॉडर्न कॉलनीतील जेष्ठ नागरिक रामा गावडे, गजानन सावंत, राजाराम बोडके सर, बाळासाहेब पाटील सर, तसेच सावंत वाडीतील क्रिकेट समलोचक महेश डोंगरे,सुर्यकांत सांगेलकर सर,लक्ष्मण राणे,प्रकाश चौधरी, दीपक गावडे,नंदु रेडकर,अजित बोडके, शैलेश गावडे,सोनाली गावडे,संकल्प गावडे, आणि कॉलनीतील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख वक्ते माननीय रत्नाकर धाकोरकर यांनी बोलताना असे सांगितले की,रमाकांत गावडे सरांच्या संशोधना बाबत माहिती दिली आणि त्यांच्या संशोधनाचा विषय “कोकणातील काजू कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा अभ्यास” हा होता.प्रा. रमाकांत गावडे यांनी सदर शोधप्रबंधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयांतील 217 कारखान्यातील जवळजवळ 400 कामगारांचा अभ्यास करून उपलब्ध माहितीचे वर्गीकरण व विश्लेषण केले.त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात व त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्या काय आहेत,कोणत्या सोईसुविधा पुरवितात, त्याची पूर्तता करण्यासाठी आजच्या काळात सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ करण्यास काय करणे आवश्यक आहे,तसेच काजू कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांना येणा-या इतर समस्या याविषयी सविस्तर संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संशोधनाचा कोकणातील काजू कारखान्याचा विकास व वृद्धी होण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.तर प्रास्ताविकातून मा. सुर्यकांत सांगेलकर सरानी सांगितले की,प्रा. रमाकांत गावडे हे आमच्या माॅडर्न कॉलनीचे अध्यक्ष असून सामाजिक कार्याची आवड असणारे आहेत.हे मागील 27 वर्षापासून बांदा येथील डॉ. गायतोंडे यांनी स्थापन केलेल्या गोगटे- वाळके महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून कॉमर्स या विषयातून एम कॉम आणि अर्थशास्त्र विषयात एम.ए पदवी प्राप्त केली आहे.तसेच त्यांनी कामगारां संबधित यू.जी.सी.मुंबई विद्यापीठाचे लघु संशोधन प्रकल्पही पूर्ण केला आहे.कॉमर्स विषयाशी निगडीत विविध विषयांवर संशोधनपर लेख त्यांचे प्रकाशित झाले आहेत. या त्यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तसेच प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा रमाकांत गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत सांगेलकर यांनी तर आभार गजानन सावंत सर यांनी मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

