सिंधुदुर्गात भाजपचा कृषी विधेयक समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅलीचा ड्रामा; डॉ. जयेंद्र परुळेकर

▪️भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी; परुळेकर यांचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०७: केंद्र सरकारच्या कृषी विधायक विरोधात आज तब्बल ४६ दिवस दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कृषी विधेयक समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅलीचा ड्रामा भाजपा करत आहेत. तेही भाडोत्री माणसे आणि ट्रॅक्टर आणून हे धक्कादायक आहे. असे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे. भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी असे आवाहन श्री. परुळेकर यांनी केले.

भाजपाने शेतकऱ्यांच्या जीवनाची माती केली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या देखील करत असल्याची त्यांनी टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे ट्रॅक्टर रॅलीचा ड्रामा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला असल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, गजानन नाटेकर उपस्थित होते.

डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, दिल्ली बॉर्डरवर दि.२६ नोव्हेंबर पासून किसान आंदोलन सुरू आहे देशभरातील शेतकरी बांधव या आंदोलनात लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत भारतीय शेतकरी आंदोलनाचा हा ऐतिहासिक क्षण आहे. जगभरात या आंदोलनाचे पडसाद उमटले असून केंद्र सरकार त्यामुळे हादरले आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने आठ वेळा बैठका घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपा  सरकारच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅलीचा ड्रामा करण्यात आला.

शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर रॅलीचा ड्रामा मध्ये भाजपाचे कार्यकर्ते भाडोत्री ट्रॅक्टर व माणसे होती असा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी करून या आंदोलनात श्रीमंताच्या गाड्या अधिक होत्या त्यात शेतकरी नव्हते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनोदी व हास्यास्पद रॅलीतील सहभाग घेतला. अंबानी, अडाणी उद्योगपतींच्या घशात  घालण्याचा डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी ४६ दिवस आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात तीस जणांचा मृत्यू देखील पहावा लागला आहे भाजपने लक्षात घ्यावे निवडणुका जिंकणे आणि देश प्रगतीपथावर नेणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांनी निवडणुका जिंकण्याच्या गमजा मारून नयेत, असे ते म्हणाले.
डॉ जयेंद्र परुळेकर म्हणाले, मागील निवडणूक पुलोवामा  जवानांच्या बळावर जिंकली, पण वारंवार देशाला फसवता येणार नाही असे डॉ. परुळेकर यांनी सांगून देशाच्या सीमेवर जवान संरक्षण करत आहेत जय जवान जय किसान म्हणण्याच्या लायकीचे भाजपा नाही भाजपाच्या तोंडात मर जवान जय किसान  असेच शोभते. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या. किसान ५२  संघटना दिल्लीत आंदोलन करत आहेत तेही अंबानी अडाणी यांच्या घशात घालण्याचा दलालीच्या विरोधात आहे.

केंद्र सरकारला कृषी विधेयके मागे घ्यावी लागतील असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी नोटाबंदी निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला आणि या नोटा बंदी मुळे भाजपा मालामाल झाली भाजपने आपली संपत्ती वाढवली. गुलाबी नोटा भाजपच्या वाट्याला आल्या अशी टीका देखील डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भात खरेदी करून त्याला योग्य भाव दिला आहे, असे ते म्हणाले.
आंबा व काजू बागायतदारांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बाबत फसवा अनुभव आहे.भाजपने शेतकऱ्यांच्या जिवनाची माती केली असून त्यामुळेच आत्महत्या वाढल्या आहेत.वैफल्यग्रस्त भाजपा शेतकऱ्यांचा अपमान ‌करत आहे. राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीचे काय कळते असे म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!