आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 साटेली- भेडशी गावचे माजी सरपंच नामदेव धर्णे यांचे निधन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२२:– साटेली- भेडशी गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव फटी धर्णे यांचे आज शनिवार दिनांक २२ जून रोजी निधन झाले.काही दिवसांपूर्वी त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. साटेली भेडशी गावातील क्रियाशील व्यक्तिमत्त्व तसेच एक प्रगतशील शेतकरी अशी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. सहा वर्षापूर्वी साटेली भेडशी गावचे सरपंच म्हणून नामदेव धर्णे यांनी गावात चांगले काम करून विकास काय असतो हे दाखवून दिले. सर्व राजकीय नेते मंडळी सोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते.नामदेव धर्णे यांचे पंचक्रोशीच्या विकासात आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यात बहुमूल्य योगदान आहे.

सामाजिक काम करत असताना त्यांनी काजू बागायती शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आपल्या मुलांना त्यांनी शेती व्यवसाय कडे वळविले. दिड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यात ते काहीसे कोमात गेले होते. त्यांनंतर बेळगाव व गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गोवा येथे उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने साटेली- भेडशी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगे, मुली, तसेच सुना, नातवंडे, भाऊ, असा बराच मोठा परिवार आहे. तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी रूपेश धर्णे व दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघाचे उपाध्यक्ष राकेश धर्णे यांचे ते वडील होत.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!