कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

तिलारी घाटातून एसटी वाहतूक सुरू ठेवा !

*🛑तिलारी घाटातून एसटी वाहतूक सुरू ठेवा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-२२*:-तिलारी घाट एसटी बससह अवजड वाहनांसाठी २० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला आहे. एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अवजड वाहतूक अवश्य बंद करा, पण एसटी बसची सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी तालुकावासीय करीत आहेत. तिलारी घाट अरुंद असून तीव्र उतार व नागमोडी वळणांचा आहे. अलीकडील दोन ते तीन वर्षांपासून या घाटातील वाहतूक वाढली आहे. गोव्याला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने याच घाटमार्गाचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे घाटातून प्रथमच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना घाटाचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. या अपघातांमुळे घाटातील वाहतूक सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी घाटातून वाहतूक बंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी २०. जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांसह एसटी बसला वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्याचा आदेश निर्गमित केला. एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. शिवाय कोकणातील मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला देखील प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घाटातून एसटी बस सेवा सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी तालुकावासीय करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!