कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

चार मंत्री असतानाही लोकांवर दबाव का टाकावा लागला?

*🛑चार मंत्री असतानाही लोकांवर दबाव का टाकावा लागला?*

*🛑वैभव नाईक यांचा सवाल : नीलेश राणे यांनी माफी मागावी! : लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास कायम !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२१*:-लोकशाहीमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. हा य ची मतदारसंघ प्रा. मधु दंडवते, बॅ. नाथ पै, सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा होता. त्यानंतर विनायक राऊत यांनी या मतदारसंघाचा वारसा चालविला होता. परंतु या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे. लोकांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. त्याबद्दल नीलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे. या जिल्ह्यात महायुतीचे चार-चार मंत्री असूनही त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला? जे व्हीडिओ आले ते का करण्यात आले? याचे आत्मपरीक्षण करून त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा सल्ला आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी येथे दिला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीने निवडणूक लढविणार आहोत. खरंतर लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील शिवसेना कार्यालयात आज आमदार नाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. नाईक म्हणाले, आपण विनायक राऊत यांची माफी यासाठी मागितली होती की, निवडणुकीपूर्वी दोन-तीन दिवस जो प्रकार सुरू होता. तो आपण कार्यकर्ते, शिवसेनेकडून थांबवू शकलो नाही. त्याबद्दल आपण त्यांची माफी मागितली. खरंतर काही लोक माझ्या – माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभे करताहेत. त्या लोकांनी खरंतर सिंधुदुर्गवासीयांची माफी मागितली पाहिजे. लोकांची मागणी नसताना त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. त्याबद्दल नीलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचीही माफी मागितली पाहिजे. कारण आपल्याच कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महाराष्ट्रातील स्वाभिमानचे अनेक कार्यकर्ते नेऊन गावागावातील आपल्याच कार्यकर्त्यांबद्दल अविश्वास दाखविला. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. केंद्रीयमंत्री म्हणून नारायण राणे गेली चार वर्षे होते. केंद्रीय मंत्री असताना त्यांना फक्त सिंधुदुर्गात मताधिक्य मिळाले, म्हणून त्यांचे मंत्रीपद वंचित राहिले की काय?, हा खरा प्रश्न • आहे, असे ते म्हणाले.१२ जुलै रोजी विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे. परंतु काही निकाल सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे न्यायालयात जाऊन चाळीस आमदारांचा निकाल लागत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका मांडत आहेत, याबाबत बोलताना नाईक म्हणाले, न्यायालयाच्या तारखा गेली दोन वर्षे सुरू आहेत. त्या तारखांवर पक्ष आपली भूमिका मांडत आहे. या आमदारांची मुदत संपत आली आहे. त्यामुळे हा निकाल लवकर लागला नाही, तर लोकांचा विश्वास राहील काय? असे ते म्हणाले. आमदार नीतेश राणे यांनी, उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही, असे म्हटले होते. या संदर्भात बोलताना नाईक म्हणाले, त्यांनी असे अनेकदा म्हटले आहे. खरंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. लोकसभा निवडणुकीत नीतेश राणे व त्या सर्वांनी मोदी यांच्यासाठी मते मागितली होती आणि आम्ही उद्धव यांच्यासाठी मते मागितली. विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. हिंमत असेल, तर तुम्ही त्यांचा दौरा अडवून दाखवा, असा इशारा त्यांनी दिला.येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तिकीट मिळाले नाही, की तुमची भाजपसोबतची भूमिका काय असेल हे दिसेल. आपण या निवडणुकीत कुठेही कमी पडलेलो नाही व कमी पड़णारही नाही. लोक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!