कारमध्ये आढळली तब्बल ३८ लाखांची रोकड
*🛑 कारमध्ये आढळली तब्बल ३८ लाखांची रोकड*
*🛑 फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस : कॉन्स्टेबल बनसोडे, देवार्डेकर यांची सतर्कता*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴फोंडाघाट, दि-२१*:-सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये तब्बल ३८ लाख ६७ हजार रुपये एवढी मोठी रोकड आढळली. फोंडाघाट चेकपोस्ट येथे ड्युटीवर असलेले कणकवली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, कॉन्स्टेबल सागर देवार्डेकर यांच्या सतर्कतेमुळे ही रोकड सापडू शकली. बुधवारी रात्री ८.३० वा. सुमारासच्या या घटनेबाबत सदरची रोकड अधिकृत असल्याबाबतचा पुरावा कारमधील दोघेही देऊ शकले नव्हते. दरम्यान, रोकड सापडल्यानंतर ती अधिकृत आहे की नाही, याचा तपास करण्याचा अधिकार तहसील कार्यालयाशी संबंधित आहे. त्यामुळे तहसीलला कल्पना दिल्यानंतर त्यांचे कर्मचारी दाखल झाले. मिळालेली रक्कम तहसीलच्या कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली.घटना अशी, फोंडाघाट चेकपोस्ट येथे ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, सागर देवार्डेकर यांनी या मार्गाने जात असलेली स्विफ्ट डिझायर कार थांबविली. कारच्या डिकीमधील एक बॅग बनसोडे, देवार्डेकर यांनी बॅग उघडली असता आतमध्ये रोकड आढळली. बनसोंडे यांनी रोकडविषयी विचारणा केली असता, कारमध्ये असलेल्या दोन्ही इसमांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. ही आमच्या व्यवसायाशी संबंधित रक्कम असल्याचे ते सांगू लागले. तर रोकडीविषयी जीएसटी बिल आहे का, असे विचारले असता त्यांनी एक पावती दाखवली. मात्र, पावती ‘विदाऊट जीएसटी’ असल्याचे बनसोडे यांच्या लक्षात आले. बनसोडे, देवार्डेकर यांनी कार तेथेच थांबवून ठेवली व कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्याशी संपर्क साधला. तडवी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, शेडगे आदी घटनास्थळी दाखल झाले. तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. पंचनाम्याअंती सदरची रक्कम तब्बल ३८ लाख ६७ हजार रुपये एवढी असल्याचे निष्पन्न झाले. सदरची रक्कम पोलिसांतर्फे तहसील कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली आहे. याबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता, सदरची रक्कम ‘ट्रेझरी’कडे ठेवण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही कळविण्यात आले आहे. ‘इन्कमटॅक्स’चे अधिकारी, कर्मचारी रक्कम अधिकृत आहे की नाही, याची खात्री करतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलकडून सांगण्यात आले.कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांचा सतर्कपणा यापूर्वीही दिसून आला आहे. ३० मे च्या रात्री खारेपाटण चेकपोस्ट येथे ड्युटीवर असलेल्या श्री. बनसोडे यांच्या सतर्कपणामुळे महामार्गावरून होत असलेली अनधिकृत बंदूक व जिवंत काडसुते वाहतूक उघड झाली होती. त्यावेळी एक बंदुक, पाच जीवंत काडतुसे मिळून २३ हजाराचा मुद्देमाल तसेच कारही जप्त करण्यात आली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

