पराभव समोर दिसू लागल्यानेच नेराश्यामुळे विरोधकांची टीका विरोधकांच्या टिकेला विकास कामातूनच उत्तर देऊ जनता जनार्दन आमच्या सोबत; अबू ठसाळे
आमच्या विकासनामा मधील योजना खेर्डी ग्रामपंचायतीत सध्या नसल्याचा सुखाई गाव विकास पॅनलचा दावा
दर्जेदार विकास कामे,नळपाणी योजनासह रोजगार,महिला सक्षमीकरणा करीता विशेष प्रयत्न करणार असल्याचे केले स्पष्ट
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंंकार रेळेकर
चिपळूण दि.०७: तरुणांच्या हाताला रोजगार,महिला सक्षमीकरण, दर्जेदार विकासकामे,शासनाच्या विविध योजनांचा ग्रामस्थांना प्रत्यक्ष लाभ या आणि अश्या अनेक नाविन्यपूर्ण योजना खेर्डी ग्रामस्थांनकरिता राबवून खेर्डी मधील माजी सैनिकांना मालमत्ता करात सवलत देण्यात येईल अशी घोषणा श्री सुखाई गाव विकास पॅनल चे सहकारी पंचायत समिती सदस्य नितीन उर्फ आबुशेठ ठसाळे,माजी सरपंच दशरथ दाभोळकर ,अनिल दाभोळकर यांनी गुरुवारी खेर्डी येथे चिपळूण अर्बन बँक संचालक निलेश भुरण यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद मध्ये केली,
खेर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील मंडळी सुशिक्षित आहेत,आज पर्यंतचा इतिहास आहे येथील जनता विकास काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात,कोणीही किती टीका केली तरी आम्ही त्यांना निवडणुकी नंतर उत्तर देऊ सध्या प्रचार आणि प्रत्यक्ष घरोघरी पोहचण्यावर आमचा जोर आहे,आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे नैराश्यापोटी विरोधक टीका करीत आहेत,दिवसेंदिवस आम्हाला जनतेचा उत्तम पाठिंबा मिळत आहे असे अबू ठसाळे यांनी या वेळी सांगितले,अबू ठसाळे,अनिल दाभोळकर, दशरथ दाभोळकर, उमेश खताते,चिपळूण अर्बन बँक संचालक निलेश भुरण,प्रकाश साळवी आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते,
श्री सुखाई गाव विकास पॅनल विकासनामा विषयी माहिती देतांना आबुशेठ ठसाळे पुढे म्हणाले की श्री सुखाई गाव विकास पॅनलचे माध्यमातून सुशिक्षीत व उच्च शिक्षित तरुण उमेदवार निवडणूक रींगणात आहेत,गावाची अपूर्ण राहिलेली नळपाणी योजना संघर्ष समिती व सन्माननीय ग्रामस्थांना विश्वासात घेवून पूर्णत्वास नेण्यास आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत, ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावातील ग्रामस्थांकरीता वेळोवेळी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे,गावामधील युवक युवतींना विविध शासकीय भरतीकरीता प्रशिक्षण शिबीरे पोलीस भरती प्रशिक्षण, सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीरे, लोकसेवा आयोगाच्या परिक्षांकिरता प्रशिक्षण शिबीरे व मार्गदर्शन विविध शिबीरांचे आयोजन केले जाईल. गावामध्ये सांडपाण्याचे योग्य नियोजन करणेसाठी अंडरग्राऊंड गटार बांधणेचे नियोजन करण्यात येईल. गावातील सर्व वाड्या एकमेकांना जोडण्यासाठी वाडीजोड रस्ता योजना राबविणार त्याचप्रमाणे नवीन वसाहतीमधील रस्ते पाखाङ्या यांचा गंभीर झालेला प्रश्न सामंजस्याने सोडवून ते तयार करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच शासनाच्या अधिनियमामधील भुसंपादनाचा अधिकाराचा वापर करुन रखडलेल्या तसेच नविन रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यात विशेष प्रयत्न करणार आहोत.आपल्या गावाचा बंद अवस्थेत असलेला गांडुळखत कचरा प्रकल्प सुरु करण्यात येईल व गावातील मोठ्या अपार्टमेंटमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खताचा प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत ग्रामपंचायत माध्यमातून करणेत येईल. ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांमार्फत वार्डानुसार जनता दरबाराचे नियोजन करणेत येणार आहे.सुशिक्षीत बेकार तरुणांना एकत्र येवून गट स्थापन करुन व्यवसाय करावयाचाझाल्यास आवश्यक शासकीय योजना, माहिती व आर्थिक तरतुद याबाबतची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाणार . यात कुक्कुटपालन, शेळ्यामेंढ्या पालन, दुग्धव्यवसाय आदी चा समावेश असणार आहे,ग्रमापंचायतीमार्फत गावातील तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्याकरीता शासनाच्या उद्योग खात्यामार्फत मेळाव्याचे नियोजन करण्यात येईल.राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण धोरणाला अवलंब करुन ग्रामपंचायतीमार्फत माहिलांकरिता रोजगार प्रशिक्षण मेळावे आयोजन केली जातील. गावातील शेतकरी बांधवांना अत्याधुनिक शेती संदर्भात मेळावे व कृषि शिबीर शेती पुरक व्यवसायांकरिता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जाईल. शेतकऱ्यांना बांधबंदिस्तीसाठी मदत करणेत येईल गावामध्ये जन्मास येणाऱ्या पहिल्या कन्यारत्नास ग्रामपंचायतीतर्फ. ५०००.०० चे अनुदान व मुलींनंतर शासन निर्देशानुसार कुटूंब नियोजन केल्यास प्रोत्साहनपर योजना राबविली जाईल. गावातील ग्रामस्थांचा शासनाच्या नविन योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी ग्रामपंचायत माध्यमातून मदत करणेत येईल यात फलोद्यान, कलम लागवड, काजु लागवड,भाजीपाला इत्यादी व्यवसायाचा समावेश असेल गावामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करण्याकरीता हीरत उद्योग धंद्याला चालना देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न व पाठपुरवठा करणार.गावातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याकरीता पोलीस यंत्रणेच्या मदतीने रहदारीचे व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यास प्राधान्य. आपल्या देशाच्या सिमेवर सेवा बजावणारे सर्व आजी व माजी सैनिक यांना त्यांच्या ग्रामपंचायतीचे मालमत्ता करामध्ये माफी देण्यात येईल.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_