क्राइम

आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी २९ जणावर गुन्हा दाखल 

आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी २९ जणावर गुन्हा दाखल

 

सावंतवाडी,दि.. १९: किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी गडहिंग्लज सह बांदा, डेगवे व माजगाव येथील तब्बल २९ जणांवर आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. यात त्यांच्यावर मनाई आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस अमंलदार राजेश नाईक यांनी दिली. इर्शाद रफिक शेख (वय-२६), आसिफ हुसैण शेख (वय- २५), ईक्लाद दस्तगिर जिनावडे (वय २७), अमीर रियाज जमादार (वय २५), अजीज सिकंदर मकानदार (वय २३), तौशिन मोहमद शफिभोजगर साद अमजद नदाफ़ (वय २०), हुजेफा दाउद किल्लेदार (वय २०), सोहेल शब्बीर कमते (वय २२, सर्व रा. गडहिंग्लज कोल्हापुर) तर जयेश दिपक पावसकर (वय २९, रा. माजगाव), गणेश गोविंद सावंत (वय २०, रा. बांदा-गडगेवाडी), श्रेयश विलास देसाई (वय १९, रा. डेगवे- मैजरवाडी), सुमित गजानन गावडे (वय २५, रा. ओटवणे- शेरवाळेवाडी), हर्ष निलेश सावंत (वय १९, रा. बांदा-गडगेवाडी) यांच्यासह अन्य अज्ञात १५ युवकांचा समावेश आहे. गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून या दोन्ही गटात वाद झाला होता. या दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती. त्यातील काही जण आंबोलीच्या जंगलात पळून गेले होते. रात्री उशिरा ते पोलीस ठाण्यात आले. मात्र दंगा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक इंगवले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!