बांधकाम कामगारांनी एजंटांपासून सावध राहवे!
*🛑बांधकाम कामगारांनी एजंटांपासून सावध राहवे!*
*🛑बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१९*:-सिंधुदुर्ग जिल्हयातील नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना भांडी मिळवून देणार, यासाठी लींकवर जाऊन ग्रुपमध्ये सामील व्हा, असे व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून काही एजंट जिल्हयातील बांधकाम कामगारांची आर्थिक फसवणूक करत आहेत. या एजंटांपासून सावध राहवे व कोणीही बांधकाम कामगारांनी लींकवर जाऊन कोणत्याही एजंटांच्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात हजारो कामगार, महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळांतर्गत नोंदीत आहेत.या नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत शैक्षणिक, विवाह, प्रसुती, गंभीर आजार, अपघात, मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत, मृत्यू क्लेम आदी योजनांद्वारे थेट आर्थिक लाभ मिळतात. मार्च २०२४ पासून नोंदीत बांधकाम कामगारांना ३० भांड्यांचा गृहोपयोगी संच मंडळामार्फत मोफत देण्यात येत आहे. कामगारांना मंडळामार्फत देण्यात येणारे फायदे मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ काम करत आहे. परंतु कामगारांना मंडळामार्फत मिळणारे थेट आर्थिक व वस्तूरूपी लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यात काही एजंट कार्यरत आहेत. त्यांनी आपली दुकानदारी सुरू करून बांधकाम कामगारांना आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे.मध्यंतरीच्या काळात याच एजंटांनी मंडळाच्या नावाने पत्रके छापून व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांमध्ये बसून नोंदणी, नूतनीकरणाच्या नावाखाली कामगारांना कोणतीही पावती न देता, पैसेही घेतल्याचे बोलले जात आहे. या एजंटांविरोधात कामगार अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याजवळ कारवाईसाठी तक्रारही करण्यात आली आहे, असेही साटम यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे एजंट पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. है एजंट भांडी मिळणार, नोंदणी, नूतनीकरणाच्या नावाखाली मेसेज पाठवून संपर्क साधण्यास किंवा ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगत आहेत. तरी बांधकाम कामगारांनी लुटारू एजंटांपासून सावध राहवे, असे आवाहन साटम यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

