कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

*🛑आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-१९*:-आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवारी वन विभागाने याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे.आंबोली घाट धबधबा परिसर, इतर घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच बेधुंद पर्यटनावर चाप लावण्याच्या उद्देशाने वन विभागाने आंबोली. घाट आणि धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान व मद्यपान करणे अशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा पथदर्शी निर्णय घेतला आहे. यामध्ये कचरा करणे १००० रुपये, वन्यप्राणी तसेच माकडांना खाऊ घालणे, छेडछाड करणे यासाठी १००० रुपये, घाटात मद्यपान करणे, मद्य बाळगणे १००० रु. आणि धूम्रपान करणे ५०० रुपये असा हा प्रथमदर्शनी दंड आकारण्यात येणार आहे. अशी घटना वारंवार झाल्यास दुसऱ्यावेळी वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे आणि वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी करण्यातं आल्या आहेत.या अंतर्गत रविवार, १६ आणि सोमवार, १७ जून या दोन दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून ११,५०० रुपयांचा दंड शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यात कचरा टाकणाऱ्या दोन व्यक्ती, धूम्रपान करणारे तिघेजण, मद्यपान करणारे दोघे, तर माकडांना खाऊ घालणाऱ्या सहा व्यक्ती अशाप्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी (IFS) यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे की, आंबोली घाटांतील निसर्ग व जैवविविधता टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करीत असेल, तर त्याला प्रतिबंधित करून तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!