करियरमनोरंजनवैभववाडीसिंधुदुर्ग

मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंतांच्या हस्ते मुला-मुलींच्या गायन, नृत्य, अँक्टींग प्रशिक्षणाचे उद्घाटन..

▪️नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत आयोजन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०६: नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला-मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे गायन, नृत्य, अँक्टींग प्रशिक्षणाचे नुकतेच उद्घाटन मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दिपक कदम यांच्या हस्ते व मराठी चित्रपट अभिनेते राजू राणे, चित्रपट सिरियल अभिनेता सुधीन तांबे, पार्श्वगायीका मयुरी नेवरेकर-चिंदरकर यांच्या उपस्थीतीत करण्यात आले. यावेळी गावातील मुलामुलींनीह उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

यावेळी नांदगाव पं.स.सदस्या सौ.हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, ग्रामविस्तार अधिकारी पी.एन. हरमळकर, ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर, सदस्या सौ.वृषाली मोरजकर, सौ.ईशा बिडये, रमिजान बटवाले, डॉ.दिशा वाळके, शेलार मॅडम तसेच विद्यार्थी पालक वर्ग उपस्थीत होत.

उद्घाटन प्रसगी बोलताना नामवंत दिग्दर्शक दिपक कदम बोलताना म्हणाले की, सिंधूदूर्ग जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं.च्या या १४ वा वित्त आयोगातून असे मुलांना विविध प्रशिक्षण देत आहे हे खरोखरच कौतूकास्पद असून यातूनच या वयामध्ये मुल घडत आहेत. असे सांगत लोकप्रतिनिधी व अधिकारी एकत्र आले अथवा दोघांच्या दिशा एक असेल तर गावाचा विकास होतो असाच प्रकार नांदगाव ला पाहवयास मिळत आहे यामुळे वेगवेगळे कौतूकास्पद उपक्रम होत असून यातूनही मुलांचा विकास होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले .तर हर्षदा वाळके यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा देत मुलांच्या ही कला गुणांचे कौतूक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर ,सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर आभार सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी मानले .

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!