खासदार नारायण राणे यांचे बांद्यात जल्लोषी स्वागत
खासदार नारायण राणे यांचे बांद्यात जल्लोषी स्वागत
बांदा, दि१४: रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बांदा येथे भाजपच्या वतीने ढोल ताशाचा गजरात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी राणे साहेब आगे बढो.. हम तुम्हारे साथ है…!! अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी आमदार राजन तेली, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, महिला तालुकाध्यक्ष रुपाली शिरसाट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विलास पावसकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, माजी सरपंच बाळा आकेरकर, दीपक सावंत, निलेश कदम, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, गुरू कल्याणकर, साई धारगळकर, दर्पण आळवे, शुभम साळगावकर, दादू कवीटकर, औदुंबर पालव, अशोक सावंत, नंदू सावंत, हेमंत मराठे, उमेश पेडणेकर आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

